NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव | लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार

HomeपुणेBreaking News

NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव | लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार

गणेश मुळे Jun 10, 2024 1:12 PM

“India” Aghadi meeting in Pune |24 फेब्रुवारी रोजी “इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात! | शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार
Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप
NCP – Sharadchandra Pawar Pune | मुलींसाठी मोफत शिक्षणाची केवळ घोषणा : अंमलबजावणी न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव | लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार

NCP – Sharadchandra Pawar – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेत लोकनेते शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने २५ वर्षांचा देदीप्यमान प्रवास पूर्ण केला. रौप्य महोत्सवी वर्षात लोकसभा निवडणुकीत मिळवलेला अभूतपूर्व विजय ताजा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रौप्य महोत्सवी स्थापना दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्र पवार, बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे व ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे ध्वजारोहण करून रौप्य महोत्सवी स्थापना दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, युवकांच्या भविष्यासाठी, महिलांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यापुढेही प्राणपणाने लढत राहणार, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी कार्यरत राहणार असा ठाम निर्धार यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या विचारधारेला अनुसरून उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान श्री. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, माजी खासदार सौ. वंदनाताई चव्हाण,ज्येष्ठ नेते श्री. अंकुशअण्णा काकडे, माजी आमदार श्री. जयदेवराव गायकवाड, माजी शहराध्यक्ष श्री. रविंद्र माळवदकर, श्री. प्रकाश म्हस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित होते.