आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!
| वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला
गेल्या काही महिन्यांपासून धानोरी, लोहगांव पोरवाल रोड व फाइव-नाइन परिसरात सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीने परिसरातील नागरीक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मनपा व पोलीस अधिकार्यांनी अनेक वेळा परिसराचे निरीक्षण केले आहे. परंतु प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल केला गेला नाही. यामुळे वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची तत्काल सुटका करण्याचा तसेच समस्या सोडविण्यासाठी आता प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला. संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली.
धानोरी सीटी हॉस्पिटल ते फाइव-नाइन रस्त्याचे प्रलंबित काम, धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करणे तसेच लोहगाव पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी मंगलवारी करण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मनपा रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी तसेच मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसातील प्रलंबित रस्ते प्रश्नांची माहिती मनपा अधिकार्यांना देताना आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमण भूमिका घेतली. प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. जे कामे अपूर्ण असतील त्यांना पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करा. परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राथमिकता देण्यास अधिकार्यांना सांगितले गेले.
संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली. धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करण्यासाठी संबंधित मारथोफिलस शाळा प्रशासनास जागेची कागदपत्रे घेऊन भू-संपादन प्रक्रिया करण्यासाठी तत्काल मनपा कार्यालयामध्ये येण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच या संबंधी २७ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याचे अपूर्ण काम बुधवारी सुरू करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोरवाल रोड येथे तात्पुरता वन-वे सुरू केला जाईल, जेणे करून परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळेल.