NCP – Ajit Pawar | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून अजित दादांच्या राष्ट्रवादीला एकाकी ठेवले जातेय का?

HomeBreaking News

NCP – Ajit Pawar | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून अजित दादांच्या राष्ट्रवादीला एकाकी ठेवले जातेय का?

Ganesh Kumar Mule Dec 15, 2025 9:10 PM

Jumbo Covid Centre : २८ फेब्रुवारीनंतर जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय
Clashes | अजित पवारांच्या रोड शो वेळी महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल

NCP – Ajit Pawar | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून अजित दादांच्या राष्ट्रवादीला एकाकी ठेवले जातेय का?

 

Pune Politics – (The Karbhari News Service) – शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पुण्यात एकत्र येऊन निवडणूक लढवणार.. दोन्ही राष्ट्रवादी एक होणार… अशा चर्चा सुरु असतानाच पुण्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यानी आपली नाराजी दाखवली होती. पर्यायाने महाविकास आघाडीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी साठी दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले कि, पुण्यात राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. पुण्यात महायुती नाही तर फक्त शिवसेने सोबत युती होईल. थोडक्यात महायुती आणि महाविकास आघाडी ने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ची सोबत पुण्यात नको म्हटले आहे. असे जरी असले तरी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी चे नेते खासगीत बोलत आहेत कि, दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन ही निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीला एकाकी ठेवण्याचा हा राजकीय अर्थ आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. (Politics on PMC Election)

| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

 

महायुती या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद दोन ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती देखील होईल. आता पुण्यात मात्र अजित पवार आणि आमची चर्चा झाली आहे, भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने लढताना तुम्हाला दिसेल. परंतु, ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

| पुण्यात महाविकास आघाडी एकत्र

आगामी महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेचे पहिले पाऊल म्हणून आज काँग्रेस भवन येथे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक संपन्न झाली.

पुणे महानगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून व त्यानंतर प्रशासकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेली पुणेकरांची लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या लढ्यात जे समविचारी पक्ष आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे या ठरावावर सर्वांचे एकमत झाले.

| शहर अध्यक्ष सुनील टिंगरे काय म्हणाले?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी म्हटले आहे कि, आम्ही स्वबळावर लढू शकतो. हा निर्णय आमच्यासाठी चांगला आहे. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी शहरात खूप चांगले काम केले आहे. उलट महायुती झाली असती तर आम्हाला मर्यादा आल्या असत्या. आता आम्ही १६५ जागेवर आमचे उमेदवार उभे करू शकतो. टिंगरे यांनी पुढे असा प्रश्न केला कि, भाजपची जर एवढी ताकद आहे तर ते दुसऱ्या पक्षातून लोक का आयात करतात?

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: