Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील नवजवान मित्र मंडळाने साकारला ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा!
Navjawan Mitra Mandal Decoration | कोथरूडमधील (Kothrud) नवजवान मित्र मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात (Ganesh Utsav 2023) ज्वालासुराच्या वधाचा हलता देखावा (Decorations) साकारला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक चांगली गर्दी करत आहेत. शिवाय मंडळाला गणेश उत्सव स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. देखाव्याची संकल्पना ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीच आहे. अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni) यांनी दिली.
मंडळाने यावर्षी ३८व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाकडून वर्षभरात अनेक सामाजिक, लोकोपयोगी व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, शिवजयंती, दहीहंडी, श्री कृष्ण जन्म, गडभ्रमंती, सार्वजनिक होळी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना फराळ वाटप तसेच दुष्काळ , पूरग्रस्त भागातील लोकांना मदत असे सातत्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवित असते. नम्रपणे वर्गणी मागत आणि मिळेल त्या ऐच्छिक वर्गणीतून मंडळ वर्षभरातील कार्यक्रम साजरे करते. (Pune Ganesh Utsav 2023)
त्याचीच दखल घेत लोकमत समूह व रिलायन्स ट्रेंड्स कडून घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला पुण्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पश्चिम विभागात मंडळाला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (Pune Ganesh Utsav Decorations)
——
News Title | Navjawan Mitra Mandal Decoration | A moving scene of the killing of Jwalasura by Navjawan Mitra Mandal in Kothrud!