Navi Mumbai, Thane, Panvel Municipal Corporation | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे, पनवेल महापालिकेची पुणे महापालिकेला सहायता | धर्माधिकारी प्रतिष्ठान ने देखील केली मदत 

HomeBreaking Newsपुणे

Navi Mumbai, Thane, Panvel Municipal Corporation | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे, पनवेल महापालिकेची पुणे महापालिकेला सहायता | धर्माधिकारी प्रतिष्ठान ने देखील केली मदत 

गणेश मुळे Jul 27, 2024 4:09 PM

PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!
Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग
Zika Virus in Pune | झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा | मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Navi Mumbai, Thane, Panvel Municipal Corporation | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे, पनवेल महापालिकेची पुणे महापालिकेला सहायता | धर्माधिकारी प्रतिष्ठान ने देखील केली मदत

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे शहरामध्ये पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका (PMC Pune), नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation), ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation), पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (Dr Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) यांचे संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार या महापालिकांनी पुण्यात सहायता केली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.  (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने पुणे शहर व ग्रामीण भागांमध्ये पुणे शहरामध्ये पुरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी असे एकूण २३०४ सदस्यांनी सहभाग घेतले व आवश्क मशिनरी उपलब्ध करून दिली.
 विशेष स्वच्छता मोहिमेकरिता एकूण ९६ जेसीबी, ४० डीपी, ५० बीआरसी, ८ हायवा, ३५ जेटिंग, १२१ घंटा गाड्या, २९४ छोटा हत्ती, १२१ कॉम्पेक्टर, २९ विन लिफ्टर व ४० टीपर याचा वापर करुन घेऊन एकूण २२८ टन कचरा, २६.५ टन गाळ व ३३.५ टन झाड कटिंग कचरा संकलित करण्यात आला. जेटिंग मशिन्स, जेसीबी मशिन्स द्वारे सूक्ष्म खोलवर स्वच्छता करण्यात आली. किटक प्रतिबंधात्मक औषधे फवारणी व व्रीडिंग स्पॉट नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली.
स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा स्वच्छ पाणी व शौचालय सुविधा पुरविण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी मोहीम व विशेष वैद्यकीय पथकांद्वारे स्थलांतरित केलेल्या नागरिकांमध्ये साथरोग नियंत्रण कार्यक्रम “सफाई अपनाओ विमारी भागाओ” हि विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी डॉ.राजेन्द्र भोसले, मा.महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका;  बी. पी. पृथ्वीराज, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), पुणे महानगरपालिका;  संदिप कदम, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, पुणे महानगरपालिका;  किशोरी शिंदे, उप आयुक्त, परिमंडळ १, पुणे महानगरपालिका,  जयंत भोसेकर, उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे महानगरपालिका व संजय शिंदे, उप आयुक्त, परिमंडळ ३, पुणे महानगरपालिका यांनी डेक्कन जिमखाना भिडे पूल, डेक्कन जिमखाना पुलाची वाडी, पाटील इस्टेट, संगमवाडी, तपोधाम कर्वेनगर, सिंहगड रोड, निंबज नगर, आदर्श नगर, सनसिटी उड्डाणपूल, फुलेनगर विश्रांतवाडी, शांतीनगर झोपडपट्टी परिसर व मुळारोड वसाहात अश्या सर्व पूरग्रस्त ठिकाणी येथे पाहणी केली व नागरीकांसोबत संवाद साधला.
या आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे तातडीने निवारण करणे विषयी व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास हेल्पलाइन कार्यरत आहे.