Naval Kishore Ram IAS | NOC वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून द्या | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | NOC वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून द्या | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना

Ganesh Kumar Mule Dec 29, 2025 7:52 PM

Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
PMC New Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात
Shivsena UBT Pune | दुकानांवरील मराठी पाट्या विषयात शिवसेना (उ बा ठा) पुणे आक्रमक

Naval Kishore Ram IAS | NOC वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून द्या | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना

 

PMC Election 2025-26  – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम  यांनी आज  स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, शिवाजीनगर येथे निवडणूक कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन केले. (PMC Election 2025-26)

तसेच तेथील निवडणूक कार्यालयांतर्गत असणाऱ्या ना हरकत कक्षाला अचानक भेट दिली. तेथे कामकाज कशा पद्धतीने चालले आहे याची माहिती घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी कक्षातील कामकाजाची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

 

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा तक्रारी निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व अर्जांची तातडीने पूर्तता करण्याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी  आयुक्तांनी सर्व विभागांना अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन निवडणूक कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात येईल, असेही सांगितले.

निवडणूक प्रक्रिया सुलभ, निष्पक्ष व नागरिकाभिमुख राहावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), उपायुक्त प्रसाद काटकर,  रवी पवार, अरविंद माळी, तुषार बाबर व सहाय्यक आयुक्त  सोमनाथ आढाव,  कैलास केंद्रे,  इंद्रायणी करचे इ. अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0