Naval Kishor Ram IAS | महापालिका आयुक्तांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केले स्वागत | शिक्षकांच्या अडचणी घेतल्या जाणून 

Homeadministrative

Naval Kishor Ram IAS | महापालिका आयुक्तांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केले स्वागत | शिक्षकांच्या अडचणी घेतल्या जाणून 

Ganesh Kumar Mule Jun 16, 2025 3:58 PM

Naval Kishor Ram IAS | पुणे महापालिका क्षेत्राच्या  समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचना | चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
Naval Kishor Ram IAS | महानगरपालिकेच्या  विविध प्रकल्पाचे कामकाज वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त  स्तरावर वॉररूम!
Naval Kishor Ram IAS | नवल किशोर राम यांनी स्वीकारला पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार!

Naval Kishor Ram IAS | महापालिका आयुक्तांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केले स्वागत | शिक्षकांच्या अडचणी घेतल्या जाणून

 

PMC School – (The Karbhari News Service) – १६ जून  रोजी शाळा प्रवेशोत्सवानिमित शाळेची पहिली घंटा, मुलांचा किलबिलाट, फुगे, फुलाच्या माळा, ढोल लेझीमचा गजर,नवगतांचे स्वागत ,नवीन पुस्तकांचा वास, गुलाब पुष्प व रांगोळीने विद्याथाचे स्वागत करत संत रामदास स्वामी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र ४२ मुलांची (मराठी) व ३७ मुलांची कन्नड या दोन्ही शाळेत  महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या शुभहस्ते उपस्थित विद्यार्थांना नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकांचे, वितरण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. (Pune Municipal Corportion Primary Education Department)

कार्यक्रमा दरम्यान  महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी संपूर्ण शाळेची पहाणी करून शाळेचे सर्व उपक्रम समजून घेतले, शाळेतील संगीत कक्ष व ग्रंथालय पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारून विद्यार्थांशी संवाद साधला. पालकांची शाळेविषयी काय वाटते याबाबतची मनोगते ऐकली. तसेच सर्व शिक्षकांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या व लवकरच त्या सोडवण्या बाबत आश्वासित केले.

या प्रसंगी  विजयकुमार थोरात , उप आयुक्त शिक्षण विभाग (प्रा) पुणे महानगरपालिका,  सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी गोविंद दांगट, सहा आयुक्त ,घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय ,गव्हाणे, अधीक्षक अभियंता,  शिल्पकला रंधवे ,सहायक प्रशासकीय अधिकारी, विभागीय पर्यवेक्षक, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक संजय गायकवाड यांनी केले व मुख्याध्यापक गणपत मोरे यांनी आभार मानले.