National Students Union of India | स प महाविद्यालयाच्या मैदानाची झालेली दुरवस्था; तत्काळ दुरुस्त करा | राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसची कॉलेजच्या प्राचार्य यांच्याकडे मागणी
PM Modi Pune Visit – (The Karbhari News Service) – 26 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारताचे पंतप्रधान व भाजप नेते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स प महाविद्यालयाच्या मैदानावर (S P College Ground) सभा होणार होती. त्याच्या तयारीचा भाग म्हणून संपूर्ण मैदान उकरण्यात आले आहे. तसेच तेथील माती काढून ठिकठिकाणी सिमेंटचे पथ बनवण्यात आलेले आहेत. विद्यार्थी हितासाठी तात्काळ मैदानाची दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या (National Students union of India) अक्षय कांबळे (Akshay Kamble) यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याकडे केली आहे. तसेच आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. (S P college Ground)
कांबळे यांच्या निवेदनानुसार महाविद्यालयाचे संपूर्ण मैदान उकरले आहे आणि पावसामुळे तर त्याची फारच दुरवस्था झाली. ही मैदानाची केलेली दुरवस्था कोण दुरूस्त करून देणार? महानगरपालिका की भारतीय जनता पक्ष? की स्वतः महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फिमधून दुरूस्त करून घेणार?
मैदानाची अशी बिकट अवस्था केली आहे की तिथे मैदान होते का असा प्रश्न पडतो. या केलेल्या अवस्थेची जबाबदारी कोण घेणार? प्राचार्य म्हणून आपण याबाबत काय पावले उचलत आहात? या मैदानाची तात्काळ दुरूस्ती करावी व ते विद्यार्थ्यांना खेळण्यास वापरता यावे अशाप्रकारे पूर्ववत करावे. अन्यथा राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेस तीव्र आंदोलन उभे करेल आणि त्यास सर्वस्वी महाविद्यालय प्रशासन जबाबदार असेल. असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
COMMENTS