Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा 

HomeपुणेBreaking News

Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा 

कारभारी वृत्तसेवा Dec 20, 2023 1:15 PM

Shivsena (UBT) Pune | पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत!
Vijaystambh Suvidha App | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप!
Schedule cast and NavBauddha Varsa Hakka | शेड्युल कास्ट आणि नवबौध्द प्रवर्गातील सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याची प्रकरणे सादर करण्याचे आदेश  | अतिरिक्त आयुक्त यांचे सर्व खातेप्रमुखांना आदेश 

Nanded City Township Property Tax | नांदेड सिटी मधील नागरिकांना PT ३ अर्ज भरून देण्याची आवश्यकता नसल्याचा माजी नगरसेवकांचा दावा

Nanded City Township Property Tax | नांदेड सिटीतील (Nanded City Pune) सदनिका धारकांना PT 3 फॉर्म (PT 3 Application Form) भरून देण्याची आवश्यकता नाही. असा दावा माजी नगरसेवक उज्ज्व केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच याबाबत पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाचे (PMC Property Tax Department) मोठे षडयंत्र असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. (Nanded City Township Property Tax)

माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार नांदेड सिटी मधील सदनिका धारकांचा कायदेशीर हक्क हिरावून घेतलेला आहे. आणि आता त्यांना त्यांचा अधिकार परत मिळेल असे दिसताना हा फॉर्म भरून आम्ही तुम्हाला टॅक्स कमी करू अशी लालूच दाखवलेली आहे. PT 3 फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेने केलेली “कर आकारणी” मान्य आहे. असे त्यांना लेखी देऊन, “कायम स्वरूपी” कर तुम्हावर लादला जाईल. नांदेड सिटी मधील नागरिकांना आमचे आवाहन आहे महानगरपालिकेच्या कर आकारणी कर संकलन विभागाच्या या षडयंत्राला बळी पडू नका हा PT3 फॉर्म भरून देऊ नका. हा फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला भविष्य काळामध्ये सवलत मिळणार नाही असा प्रचार चुकीचा आहे. नांदेड सिटी मधील नागरिकांना आमची विनंती आहे आपण संघटित व्हा आणि महानगरपालिकेला आम्ही दिलेल्या फॉर्ममध्ये हरकत नोंदवा इतर कुठलाही फॉर्म भरून देऊ नका. लोकसभेचे व विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आपले आमदार भीमरावअण्णा तापकीर आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कानावर आम्ही हा विषय घालणार आहोत. तोपर्यंत कुणीही PT 3 फॉर्म भरून देऊ नका. असे आवाहन या नगरसेवकांनी नागरिकांना केले आहे. (Pune Municipal Corporation)