Murlidhar  Mohol | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती   | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुण्यातील विविध विकासकामांचा आढावा

HomeBreaking Newsपुणे

Murlidhar Mohol | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुण्यातील विविध विकासकामांचा आढावा

गणेश मुळे Jul 08, 2024 4:53 PM

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!
Special Fund for PMC | पूरस्थिती नियंत्रण आणि ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला 200 कोटींचा विशेष निधी
PMC Pre Monsoon Work | BJP Pune | पुणे महापालिकेने पावसाळा पूर्व कामे 90% पूर्ण केल्याचा दावा चुकीचा | पुणे भाजपचा आरोप

Murlidhar  Mohol | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती


| केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुण्यातील विविध विकासकामांचा आढावा

 

Pune Airport New Terminal- (The Karbhari News Service) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (MP Murlidhar Mohol)

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुण्यातील लोकनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय मंत्री म्हणून आज दिवसभर आयोजित मॅरेथॉन बैठकांमध्ये मी पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये पुणे महानगरपालिका, पीएमपीएमएल, पुणे मेट्रो, पुणे विमानतळ तसेच पुणे रेल्वे विभाग यांच्याशी संबंधित विविध कामांची माहिती घेण्यात आली. वरील सर्व विभागांमधील प्रगतीपथावरील सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलसंदर्भात बोलताना ते म्हणाले की नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु झाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली असल्याने नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या 14 जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे’

ते पुढे म्हणाले, आपल्या पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे, हा आपला प्राधान्याचा विषय असून या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि विविध विभाग प्रमुखांशी चर्चा केली. पुणे शहरात मेट्रो मार्गांचा विस्तार होत असला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक बसेसची संख्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने एकूण 777 नवीन बसेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

शहराचे पर्यावरण व सार्वजनिक वाहतूक यांचा समतोल साधण्यासाठी डिझेल बसेसचे रूपांतर CNG बसेसमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 226 डिझेल बसेस आता CNG बसेसमध्ये लवकरच रूपांतरित करण्यात येणार आहेत, तशी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.

पुणे मेट्रोच्या सद्यस्थिती आणि भविष्यातील योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते झाले. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून मेट्रोच्या रुपाने पुणेकरांसाठी सक्षम वाहतूक व्यवस्था तयार होत आहे, हे स्पष्ट आहे. शहरातील काही भागात मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यात स्वारगेट ते कात्रजदरम्याचा भूमिगत मार्गही असून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्वरीत त्याचे काम सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक, एसएऩडीटी ते माणिकबाग, हडपसर-लोणीकाळभोर या मार्गांबद्दलही विचार सुरू आहे. याला मान्यता मिळाल्यावर त्याचे काम सुरू होईल.

यावेळी पुणे विमानतळावरील टर्मिनलपर्यंत मेट्रो नेणे आणि चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गाबद्दल सर्व मुद्द्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे पुणे मेट्रो आणि फिडर बससेवेद्वारे अधिकाधिक नागरीकांना फायदा होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंच मेट्रो कनेक्टीव्हिटी देण्यावर आपण भर दिला पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

यासोबतच, पुणे महानगरपालिकेशी संबंधित रस्ते, उड्डाणपुल, नदीसुधार प्रकल्प, 24X7 पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर रखडलेले प्रकल्प यांच्याबाबतही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी आढावा घेतला. वरील सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करून नागरिकांचे जीवन सुखकर करावे, अशी सूचनाही मुरलीधर मोहोळ यांनी केली.