Mumbai corporation election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान 

HomeBreaking NewsPolitical

Mumbai corporation election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान 

Ganesh Kumar Mule Oct 16, 2021 5:19 PM

Disqualified contractors in the tender process have to go to the PMC for the deposit amount!
Swarget – Katraj Underground Metro | स्वारगेट – कात्रज भुयारी मेट्रो | बालाजी नगरला अतिरिक्त भुयारी स्टेशन | महापालिकेचे आर्थिक दायित्व नाही
PMC : शहरात गुरुवारी पाणी बंद! 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान

 भाई जगताप यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. भाई जगताप यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता आहे.

भाई जगताप यांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं तर शिवाजी पार्कवर काँग्रेस आगामी पालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची दाट शक्यता आहे. भाई जगताप यांच्या उपस्थितीत याआधीच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक झाली होती. यात काँग्रेस पक्ष २२७ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं जगताप यांनी स्पष्ट सांगितलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांना मुंबईत निमंत्रित करण्यासाठीचं नियोजन जगताप यांनी ऑगस्ट महिन्यापासूनच सुरू केलं होतं. २८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा घेणार असल्याचं काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. आता राहुल गांधी डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये आलेच तर ते कोणत्या विषयावर बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0