Mula-Mutha river | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ‘लोगो’ व ‘मॅसकॉट’चे उत्साहात अनावरण

HomeBreaking Newsपुणे

Mula-Mutha river | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ‘लोगो’ व ‘मॅसकॉट’चे उत्साहात अनावरण

Ganesh Kumar Mule Jan 02, 2023 2:14 PM

Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार
SRA | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प ‘लोगो’ व ‘मॅसकॉट’चे उत्साहात अनावरण

पुणे|: पुणे शहरासाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला ‘PuneRé (पुणेरी) लोगो’ व ‘पुणेरी काका’ या ‘मॅसकॉट’चे आज, सोमवारी (२ जानेवारी २०२३) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच या प्रकल्पाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती असणारी www.punere.in ही वेबसाइट सुद्धा लाँच करण्यात आली. यावेळी पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांना मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. हे शहर मुळा-मुठा नदीच्या काठी वसलयं. त्यामुळे अर्थातच मुळा-मुठा नदीसोबत पुणे शहरातील नागरिकांचे एक प्रकारे नाते जोडले गेले आहे. कारण पुणे शहराच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची साक्षिदार मुळा-मुठा नदी आहे. पुणे शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या याच मुळा-मुठा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतलायं.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. आज, या प्रकल्पाच्या अनुषंगाने राबवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटसह PuneRé (पुणेरी) लोगो, ‘पुणेरी काका’ ‘मॅसकॉट’चे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला मा.महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) डॉ.कुणाल खेमनार, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(जनरल) रविंद्र बिनवडे, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) विकास ढाकणे, मा.मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, मा.शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मा.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिक घेणार प्रतिज्ञा
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे, पूर येण्याचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, नदीत पाणी टिकवून ठेवणे, नदीकडे जाण्याचा रस्ता सुधारणे, ऐतिहासिक वास्तू, उद्याने आणि अस्तित्वात असलेल्या जागांचे एकीकरण करणे, हे सहा प्रमुख उद्देश आहेत. प्रकल्पाचा नागरिकांना नेमका काय फायदा होणार आहे, याबाबत माहिती व एक प्रतिज्ञा पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात येणार आहे. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने ही प्रतिज्ञा आहे.

विविध स्पर्धांचे आयोजन
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत पुणे शहरातील नागरिकांना माहिती मिळावी, प्रकल्पाबाबत असणाऱ्या त्यांच्या शंका दूर व्हाव्यात, यासाठी पुणे महानगरपालिका मा.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या स्पर्धा देखील घेत आहे. तसेच हा प्रकल्प कशा पद्धतीचा असणार आहे, याची माहिती नागरिकांना देण्यासाठी ‘एक्सपीरियंस सेंटर’ सुद्धा तयार करण्यात येणार आहे. याशिवाय रिल्स, फोटोग्राफी, इमोजी, मेमोरीज्, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम पुणे महानगरपालिका PuneRé या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून राबवणार आहे. यासर्व उपक्रमांची माहिती PuneRé सोशल मीडिया पेजेस् तसेच www.punere.in या संकेतस्थळावर सुद्धा देण्यात येणार आहे.