MP Supriya Sule | “महिलांनो डरना मना है, राज्यात आघाडीची सत्ता आणा | सुप्रिया सुळे | प्रशांत जगताप यांना विधानसभा उमेदवारीचे  सुळेंकडून संकेत

HomeBreaking Newsपुणे

MP Supriya Sule | “महिलांनो डरना मना है, राज्यात आघाडीची सत्ता आणा | सुप्रिया सुळे | प्रशांत जगताप यांना विधानसभा उमेदवारीचे सुळेंकडून संकेत

गणेश मुळे Jul 06, 2024 9:39 AM

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा
Shirur Loksabha Constituency – Dr Amol Kolhe | “हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले
 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!  

MP Supriya Sule | “महिलांनो डरना मना है, राज्यात आघाडीची सत्ता आणा | सुप्रिया सुळे

MP Supriya Sule – (The Karbhari News Service) – काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे. हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. हे सरकार कधी पर्यंत चालेल माहीत नाही, मात्र आम्ही सरकार अस्थिर करणार नाही. हे कॉपी करून आलेले सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत कितीही धमकी येऊ द्या ‘ बहिणीनो डरना मना आहे ‘ आता येणाऱ्या विधानसभेसाठी ७० दिवस शिल्लक राहिलेत, घरोघरी आपल्याला पोहोचून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणायचे आहे, असे आवाहन संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, रवींद्र माळवदकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रुपाली शिंदे, आसिफ शेख, पप्पू घोलप, दिपक कामठे, मोहमद्दीन खान, बाळासाहेब कवडे, आसिफ पटेल, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे भाजपचे सरकार नसून महागाई , बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार आहे.  असे बोलून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले,
हा देश तुमचा आमचा सर्वांचा आहे. जाती भेदाच्या भिंती तोडून देश एकसंघ  कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांची घाऊक गर्दी दिसून आली. वेगवेगळे पदाधिकारी वाजत गाजत कार्यकर्त्यांच्या गर्दी जमा करून आपले शक्ती प्रदर्शन दाखवीत होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच महापालिकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी शैलेश बेल्हेकर, शादाब खान, यांचा पक्षात प्रवेश झाला.

प्रशांत जगताप यांना विधानसभा उमेदवारीचे खा.सुप्रिया सुळेंकडून संकेत…

केंद्र व राज्य सरकारचे विरोधात तसेच महागाई बेरोजगारी अनेक मुद्द्यांवर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात या आंदोलनाची राज्यात चर्चा होते सर्वसामान्यांचे आवाज उठवण्याचे काम प्रशांत जगताप करतात लोकसभेला तुमची साथ राहिली विधानसभेलाही साथ द्या असे आवाहन करत प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा उमेदवारीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले.