MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

Ganesh Kumar Mule Aug 25, 2023 7:41 AM

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघाच्या सहकार्याने नागरिकांनी केली इर्शाळवाडीतील आदिवासी बांधवांना मदत
HCMTR Road |MP Murlidhar Mohol |  एचसीएमटीआर रस्ता वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणार  | केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन 
Insurance For Warkari | वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच  (Maharashtra) यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. (MP Supriya Sule | Drought in Maharashtra)

महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. शिवाय १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. अनेक ठिकाणी तर पाऊस पडलेलाच नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सांगत ट्विट करून सुळे यांनी ही मागणी केली आहे. (Less rain in Maharashtra)

पाऊस आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.