Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

HomeपुणेBreaking News

Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

गणेश मुळे Mar 05, 2024 3:04 PM

Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात
NCP Youth Kothrud | प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने दिले निवेदन
NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी

Monorail Project Pune |  थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध!

| राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाने विचारले प्रश्न

 

पुणे – ( The Karbhari News Service) – Monorail Project Pune | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध केला आहे.

कोथरूड येथे मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक वर्षांपासून थोरात उद्यान नामक सुंदर, मोठे आणि मनमोहक असे पुणे मनपाचे एक उद्यान स्थित आहे. हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि घेण्यासाठी मोकळा श्वास देत आले आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या सोयीचे बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी मोनोरेल साकारण्यासाठी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे काही बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी प्रस्तावित मोनोरेलसाठी वृक्षांची कत्तल केली जाणार असून अनेक ठिकाणी बांधकाम करणेही मनपाला आवश्यक आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून विरोधही केला जात आहे.

सदर ठिकाणी नागरिकांतून कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प साकारला जात आहे. असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.

या प्रकल्पामुळे पर्यावरणीय नुकसान तर अटळ असून याचसह मनपातर्फे आजवर विकसित करण्यात आलेल्या सुविधाही हटवल्या जातील, ज्यामुळे आजवर या सुविधांवर नागरिकांच्या कररूपी निधीतून केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करत नैसर्गिक उद्यान चिरंतन ठेवणे, हे नक्कीच आमचे कर्तव्य आहे.

त्वरित हा प्रकल्प थांबवण्याची सूचना केली असून असे न केल्यास भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गुरनानी यांनी दिला.