MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार  | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

HomeपुणेBreaking News

MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

Ganesh Kumar Mule Sep 24, 2022 1:53 PM

Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार
Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे
Doctor’s Day | डॉक्टर्स डे निमित्त दहा कोरोना योद्धा डॉक्टर्स चा सन्मान

सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली. तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप  यांच्या कडे दिले.