Mohan Joshi Congress | सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात महिलांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन
Pune News – (The Karbhari News Service) – महिला उद्योजक होऊन स्वावलंबी व्हाव्यात याकरिता काँग्रेस पक्षाच्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात बचतगट मेळाव्याचे आयोजन कोथरूड येथे करण्यात आले होते. मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. (Marathi News)
काँग्रेस पक्षाच्या आदरणीय नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बचतगट मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उद्योजकता, स्वावलंबन, रोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.
बचतगटाच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांना अधिक प्रोत्साहन मिळावे, त्या सक्षम व्हाव्यात, असा काँग्रेस पक्षाचा आणि आदरणीय सोनियाजींचा प्रयत्न राहिला आहे. त्या भावनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला. यातील काही सहभागी महिला निश्चितच उद्योजक बनतील, असा विश्वास मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

मेळाव्याचे संयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे आणि सुरेखा किशोर मारणे यांनी केले.याप्रसंगी काँग्रेसचे नेते चंदूशेठ कदम, सुनील मलके, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सीताराम तोंडे, कोथरूड काँग्रेस अध्यक्ष रवींद्र माझीरे, हनुमंत गायकवाड, बंटी जाधव, आकाश महेश, विचारे, संजय मानकर, युवराज गदगे, प्रशांत वेलणकर, कृष्णा नाकती, देवकळे, रंजना पवार, नीता हिवळे, नीता पाटोळे, पूजा चव्हाण, शीला डोईफोडे, पुष्पा गोळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सरचिटणीस सुरेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS