MLA Sunil Kamble | पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन 

HomeBreaking News

MLA Sunil Kamble | पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन 

Ganesh Kumar Mule Nov 12, 2024 7:52 PM

PMPML Pune Bharti | PMPML मध्ये ड्रायव्हर, कंडक्टर ची भरती सुरु आहे कि नाही? जाणून घ्या सविस्तर 
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे पत्र व्हायरल!
Shasan Aapalya Dari | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

MLA Sunil Kamble | पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

 

Pune Cantonment Assembly Constituency – (The Karbhari News Service) – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार, आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री  मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  याप्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले, ‘विकासाच्या मुद्द्यावर जनते समोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील.
मागच्या निवडणुकीला मला मताधिक्य कमी होतं. पण यावेळी ५० हजार मतांचे लीड मला मिळेल असा विश्वास आहे.

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील 5 वर्षात भाजपने पुणे शहराचा विकास केला आहे, अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले आहेत, यामुळे पुणेकर भाजपला साथ देणार यात शंका नाही.  आमदार सुनील कांबळे यांच्या मागील 5 वर्षांच्या कामाचे कौतुक करत यंदाही कॅंटॉन्मेंट मध्ये महायुतीलाच विजय मिळेल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ काल  प्रभाग १६ व १७ भागातील निवडुंग विठोबा मंदिर आझाद आळी येथून विठू माऊलीचे आशीर्वाद घेऊन भव्य पदयात्रा काढण्यात आली.  या पदयात्रेसाठी भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे कॅन्टोन्मेंट चे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट चे भाजपाचे पुणे मनपा चे माजी सभागृह नेते गणेश बिडकर,दक्षिण कन्नडा चे भाजपा खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, राष्ट्रवादीचे असंघटित केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष विनोद काळोखे, नेते सागर पवार, कॅन्टोन्मेंट भाजपाचे दिलीप मामा बहिरट, पुरूषोत्तम पिल्ले आण्णा, मांगीलाल शर्मा आदींसह महायुती मधील मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0