PMRDA | पीएमआरडीएने वाढवली सदन‍िकेच्या अर्जाची मुदत | नागर‍िकांच्या अडचणी लक्ष्यात घेता महानगर आयुक्तांनी घेतला न‍िर्णय

Homeadministrative

PMRDA | पीएमआरडीएने वाढवली सदन‍िकेच्या अर्जाची मुदत | नागर‍िकांच्या अडचणी लक्ष्यात घेता महानगर आयुक्तांनी घेतला न‍िर्णय

Ganesh Kumar Mule Nov 11, 2024 8:19 PM

Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून  PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार 
PMRDA signed MoU with South Korea Bilateral cooperation in Urban Development
Yogesh Mhase IAS | पीएमआरडीए (PMRDA) च्या आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती | राहुल महिवाल यांची बदली 

PMRDA | पीएमआरडीएने वाढवली सदन‍िकेच्या अर्जाची मुदत | नागर‍िकांच्या अडचणी लक्ष्यात घेता महानगर आयुक्तांनी घेतला न‍िर्णय

 

Pune News – (The Karbhari news Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्र. १२ आण‍ि पेठ क्र. ३०-३२ येथील शिल्लक असलेल्या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात येत आहे. नागर‍िकांना यासाठी आवश्यक कागदपत्रे म‍िळण्यास वेळ लागत असल्याची स्थ‍िती आहे. त्यामुळे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागर‍िकांच्या व‍िनंतीनुसार ३० नोव्हेबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ द‍िली आहे.

पीएमआरडीएने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (1 आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १२ नोव्हेबरपर्यंत अर्ज मागव‍िण्याची मुदत संपुष्टात येणार होती. परंतु, ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी जी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती म‍िळण्यास नागर‍िकांना अध‍िकचा वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकांनी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी व‍िनंती पीएमआरडीएकडे केली होती. याची महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दखल घेत सदन‍िकेसाठी अर्ज करण्यास ३० नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ द‍िली.

सुधार‍ित वेळापत्रक

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागर‍िकांच्या व‍िनंतीनुसारी मुदतवाढ द‍िल्याने याचा गरजुंना लाभ होईल. या सुधार‍ित वेळापत्रकानुसार इच्छुकांना आता सदन‍िकेसाठी ३० नोव्हेबरपर्यंत अर्ज करता येईल. यानंतर १७ ड‍िसेंबरला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारुप यादी प्रसिद्ध करत त्यावर १८ ड‍िसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. यानंतर २७ ड‍िसेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंत‍िम यादी प्रसिद्ध करत ३० ड‍िसेंबरला ड्राय रननंतर ३१ ड‍िसेंबरला अंत‍िम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रत‍िक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी – Helpline No.- ०७३१६९०५७४५
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – https://housing.pmrda.gov.in

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0