PM Narendra Modi on Congress | विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला |पंतप्रधान नरेंद्र मोदी 

HomeBreaking News

PM Narendra Modi on Congress | विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला |पंतप्रधान नरेंद्र मोदी 

Ganesh Kumar Mule Nov 12, 2024 8:22 PM

Pune Metro | PM Modi Pune Tour | पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रुबी हॉल या मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ
Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल
PM Modi in Pune | PM lays foundation stone and inaugurates various development projects in Pune, Maharashtra

PM Narendra Modi on Congress | विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला |पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

PM Narendra Modi in Pune – (The Karbhari News Service) – मराठी भाषेला अभिजात भाषास अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्ष मागणी झाली पण काँग्रेसने कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी निभावली आहे. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. आघाडीला मी आव्हान देतो की, राहुल गांधी यांच्या तोंडून त्यांनी वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेस ला केवळ सत्ता हवी त्याकरीता त्यांनी तुष्टीकरण खेळ खेळला आणि तेच काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. त्यामुळे जनतेने सावध राहावे आणि हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे. ही निवडणूक देशाला विकासाच्या वाटेवर नेणारी आहे. देश विरोधी ताकद यांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यातील स.पा.महाविद्यालय येथे आयोजित प्रचार सभेत व्यक्त केले. (Pune News)

पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील दहा अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघातील महायुती उमेदवार प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे , खासदार श्रीरंग बारणे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर,शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे , आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे , यांच्यासह ३१ मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी केशव शंखनाद ग्रुप यांनी शंखनाद करत उपस्थितांची मने जिंकली.

पुण्यातील लाडक्या बहिण आणि भाऊ यांना माझा प्रणाम असे मराठी मध्ये भाषणाला सुरवात करत मोदी म्हणाले, मी महाराष्ट्र मध्ये विविध भागात फिरलो असून जनतेचे अभूतपूर्व समर्थन मला मिळत आहे. विमानतळ ते सभा स्थळ अनेक लोक गर्दी करून अभिवादन करत होते. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत येईल. पुणे आणि भाजप यांचा संबंध विचार, संस्कार, आस्था असा आहे. महायुती सरकार आगामी काळात वेगाने विकास करेल. पुण्यात पुढील पाच वर्ष विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील. परकीय गुंतवणूक मध्ये रेकॉर्ड ब्रेक देशात गुंतवणूक झाली असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात या भागात नवी गुंतवणूक होत असून स्टार्टअप द्वारे तरुणांना लाभ मिळाला आणि रोजगार निर्मिती झाली. पुण्याचा ऑटोमोबाईल क्षेत्र वेगळी ओळख आहे. नागरिकांची स्वप्ने आणि आवश्यकता या माझ्या ऊर्जा आणि योजना कामाचा आधार आहे. पुण्यात मेट्रो जाळे विस्तारीकरण होत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. रिंगरोड , मीसिंग लिंक प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पालखी मार्ग देखील वेगाने निर्माण होत असून ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे. महायुती पूर्वी जे सरकार राज्यात चालवत होते त्या आघाडीला सांगण्यासारखे काही विकास प्रकल्प नव्हते. विकासासाठी एकच विकल्प आहे महायुती आहे तरच राज्याची गती आणि प्रगती आहे. काँग्रेसच्या कट करस्थनाचा भाग कर्नाटक मध्ये दिसून येत आहे. तिथे सरकार बनले पण काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहे. या लुटीचा पैसा महाराष्ट्र मध्ये पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसने जम्मू काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महाराष्ट्र मध्ये कोरे संविधान पुस्तके ते वाटप करतात. सात दशक संविधान देशात लागू का नव्हते याबाबत त्यांनी भूमिका मांडावी. जम्मू काश्मीर मध्ये संविधान प्रथमच लागू झाले आहे कारण जनतेने मोदीला सेवा संधी दिली. आम्ही कलम ३७० जमिनीत गाडले आहे. या कलमाने जम्मू आणि काश्मीर देशापासून वेगळे ठेवले, आतंकवादला प्रोत्साहन दिले. आज काश्मिरच्या लाल चौकात तिरंगा डौलाने फडकत असून दिवाळी देखील तिथे साजरी झाली.
सात दशक जी भाषा पाकिस्तान बोलत होती ती भाषा आज काँग्रेस बोलत आहे. जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याची भाषा काँग्रेस बोलत असून ते देश किंवा महाराष्ट्र सहन करणार नाही.

अजित पवार म्हणाले, नेहमी पुणेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. देशात मोदी सरकार दूरदृष्टी मधून गतीने विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकासाचा वेग गतीने वाढवला जाईल. निवडणुकीत अनेक नेते येतात आणि आरोप व प्रत्यारोप होत असतात. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचा मान मोदी यांना मिळाला आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात वाढवणं या जागतिक बंदर निर्मितीसाठी निधी मंजूर केला. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या सरकारला मिळणाऱ्या निधीपैकी निम्मा निधी शासकीय पगारावर जातो आणि बाकी निधी विकास कामास वापरला जातो. पण आघाडी सरकारने ज्या घोषणा केल्या त्यासाठी तीन लाख कोटी रुपये लागत असून ते विकास कसा साधणार याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी . केंद्र आणि राज्य मध्ये एक विचारांचे सरकार आले तर विकास गतीने होतो त्यानुसार जनतेने आम्हाला ताकद द्यावी.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशातील सर्वाधिक भेटी पुण्याला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. कोविड काळात देशाने जगातील १०० देशांना लस पुरवली, जी -२० परिषद आयोजन केले. देशातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचा विचार करून योजना राबवल्या गेल्या आहे. काँग्रेसने देशात गरीबी हटवली नाही पण मोदी सरकारने दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेवर आणले. विमानतळ संख्या १५७ पर्यंत वाढवले. नवे १६ एम्स सुरू करण्यात आले. दिवसाला २८ किमी नवे रस्ते तयार होत आहे. अयोध्या राम मंदिर तयार झाले, जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० हटवले गेले. दहा वर्षात महाराष्ट्रसाठी दहा लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून दिले गेले आहे. साडेसात हजार कोटी रुपये राज्यातील साखर कारखान्यांना मदत दिली गेली आहे.

रामदास आठवले म्हणाले, ‘ज्या जिल्ह्यांनी अनेकांची जुळवली मने, त्या जिल्ह्याचे नाव आहे पुणे ‘, ‘ आज देशात इतिहास घडत आहे नवा, कारण आजही देशात आहे मोदी यांचा करिश्मा ‘ , ‘जगभर होत आहे नरेंद्र मोदींची स्तुती ,म्हणूनच घडत आहे जगात भारताची स्तुती ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य सभा होत आहे. माझ्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी असून ज्यांना न्याय हवा त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना नको त्यांनी कुठेही जावा. आघाडी ही झोपेत असून त्यांना माहिती नाही आम्ही काय तयार केली आहे. युतीला लोकसभेत कमी मते मिळाली नाही पण त्यांनी खोटा प्रचार केला संविधान बदलणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बापाचे बाप आले तरी संविधान बदलणार नाही. मोदी यांना हरवण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहे. शरद पवार यांना मी सांगितले होते की, तुम्ही नरेंद्र मोदी यांचे सोबत या कारण विकासाला गती दिली पाहिजे. मला जागा मिळाल्या नाही तरी मी युती सोबत असून आघाडीच्या उमेदवारांचा काटा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू. चुकीच्या पद्धतीने आघाडी नेत्यांनी मुद्दे मांडून समाजाची दिशाभुल करू नका. आम्ही कोणत्या काँग्रेस नेत्याला कारागृहात टाकले नाही, ज्यांना जेल मध्ये जायचे ते जातात आणि येतात. १७० ते १८० उमेदवार आमचे निवडणुकीत निवडून येतील. सरकार आपले येणार आहे ‘मी काढतो आहे त्यांचा काटा,माझ्या पक्षाला मिळावा सत्तेत वाटा..’

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगात एका क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण साहित्य आपण सुरवातीला आयात करत होतो पण आता एक लाख कोटींचे संरक्षण साहित्य निर्यात केले आहे. पुण्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्हा महायुती सरकार येण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुण्याची भूमी ही संत आणि समाज सुधारक यांची भूमी आहे. पुण्यात पुन्हा एकदा महाविजय संकल्प झाला पाहिजे. महायुती काळात विकास कामांना निधी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून मिळाली आहे. विकास गंगा पुढे सुरू ठेवण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणे ते मुंबई दरम्यान अटल सेतू माध्यमातून सुखकर प्रवास झाला आहे. रोजगार निर्मिती , कल्याणकारी योजना अंमलबजावणी महायुतीने राबवली आहे. लाडकी बहिण योजना बाबत कोणता निधी कमी पडणार नाही पण त्याबाबत अपप्रचार केला जात आहे. महिला सुरक्षा बाबत सरकार गंभीर असून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0