MLA Ravindra Dhangekar | अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार यांच्यावर तातडीने कारवाई करा | आमदार रविंद्र धंगेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

HomeपुणेBreaking News

MLA Ravindra Dhangekar | अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार यांच्यावर तातडीने कारवाई करा | आमदार रविंद्र धंगेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

गणेश मुळे May 22, 2024 3:56 PM

MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप
MLA Ravindra Dhangekar | यंदाही कसबा आम्हीच जिंकणार – रवींद्र धंगेकर
Book Distribution | “भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

MLA Ravindra Dhangekar | अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार यांच्यावर तातडीने कारवाई करा | आमदार रविंद्र धंगेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Pub and Bar – (The Karbhari News Service) –  पब, हुक्का पार्लर, रूफ टॉप रेस्टॉरंट यांनी महापालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या अतिक्रमणावर आपण तातडीने कारवाई करून बुलडोझर चालवावा. महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क यांच्याकडून संयुक्त कारवाई करावी. अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. (Pune Porsche Car Accident)
आमदार धंगेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. शांत, सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पण, अलीकडच्या काळात पुण्यात पब संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब, बार उघडे ठेवण्याला परवानगी दिली. त्यामुळे या पब संस्कृतीचे पेव अधिकच फुटले आहे. या सर्वाचा परिणाम पुणे शहराची संस्कृती बिघडण्यावर होत आहे. विशेषतः या संस्कृतीमुळे तरुण पिढीचे आयुष्य बरबाद होत आहे, हा अत्यंत चिंतेचा मुद्दा बनला आहे.
धंगेकर यांनी पुढे म्हटले आहे कि, कल्याणी नगर येथे भीषण अपघाताची घडलेली घटना अशा पब संस्कृतीमुळे घडली आहे. यात दोन निष्पाप जीव गेले. मन सुन्न करणारी ही घटना आहे. पण प्रशासन मात्र आरोपीला वाचवण्यासाठी झटले. आरोपीसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचा खरा चेहरा पुण्यातीलच नव्हे तरराज्यातील, देशातील जनतेसमोर आला आहे. गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा, हे प्रशासनाने या घटनेतून दाखवून दिले. आपण अशा प्रशासनाचा भाग न होता पब संस्कृती विरोधात ठाम पावले उचलावीत, अशी माझी आपल्याकडे विनंती आहे. असे धंगेकर पुढे म्हणाले.
पब, हुक्का पार्लर, रूफ टॉप रेस्टॉरंट यांनी पालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या अतिक्रमणावर आपण तातडीने कारवाई करून बुलडोझर चालवावा. महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क यांच्याकडून संयुक्त कारवाई करावी. कर चुकविणाऱ्या, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या, रात्री उशिरापर्यंत पब, रेस्टॉरंट बारमध्ये धिंगाणा घालू दे चालकांवर गुन्हे दाखल करावेत. या कारवाईसाठी आणि मोहिमेसाठी निष्कलंक, कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. जेणेकरून योग्य दिशेने कारवाई होईल. अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे.