Merged Villages Draft DP | समाविष्ट गावांच्या प्रारूप विकास आराखड्या बाबत माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली ही मागणी!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये (PMC Limits) 11 गावे समाविष्ट केल्यानंतर विहित मुदतीत मनपा प्रशासनाने प्रारूप विकास आराखडा (Draft DP) प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार तो विकासा आराखडा राज्य शासनाने ताब्यात घेतला. दरम्यानच्या काळात शासनाने उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे मनपा हद्दीतून वगळली. त्यामुळे नऊ गावांचा विकास आराखडा कसा करायचा हा प्रशासनवासमोर प्रश्न आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा अधिकार नसताना पीएमआरडीए ने केला. याबाबत आमचे म्हणणे असे आहे की, पीएमआरडीअए यांनी केलेला आराखडा आणि पुणे मनपा ने तयार केलेला आराखडा याचा एकत्रित मेळ घालून विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि सहसंचालक नगर विकास पुणे आणि पर्यावरण तज्ञ दोन सदस्य अशी समिती तयार करून हा आराखडा लवकरात लवकर तयार करून मंजूर करून जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. असे
माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटल आहे.
COMMENTS