Maval Shree Bodybuilding Competetion | पाचव्या वर्षातील मावळ श्री चा शिलेदार ठरला विनोद कागडे!

HomePune

Maval Shree Bodybuilding Competetion | पाचव्या वर्षातील मावळ श्री चा शिलेदार ठरला विनोद कागडे!

Ganesh Kumar Mule Dec 30, 2025 7:15 PM

PMC Ward 11 – Rambaugh Colony Shivtirthnagar | प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर   –  प्रभागाची व्याप्ती आणि सविस्तर माहिती जाणून घ्या
Maharashtra cabinet Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील एकूण 5 निर्णय जाणून घ्या सविस्तर
Everesting Competition | भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगडावर संपन्न

Maval Shree Bodybuilding Competetion | पाचव्या वर्षातील मावळ श्री चा शिलेदार ठरला विनोद कागडे!

 

Bodybuilding – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हास्तरीय मावळ श्री 2025 या स्पर्धेचे सलग पाचव्या वर्षीचे आयोजन विनय वरुते यांनी विश्वभूमी फाउंडेशन मुळशी यांच्यावतीने व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने केले होते. विनोद कागडे व अक्षय शिंदे यांच्या अतिशय अतितटीच्या झालेल्या सामन्यात मावळ श्री 2025 चा मानकरी यु एफ सी जिमचा विनोद कागडे व उपविजेता अक्षय शिंदे ठरला. मेन्स फिजिक्स श्रीचा मानकरी अवेंजर्स जिमचा स्वप्नील बच्चे ठरला. (Pune News)

या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी संदीप तिवडे, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी अजय रक्ताटे ठरला.

या प्रसंगी लागीर झालं जी फेम राहुल मगदूम, इंटरनॅशनल बॉडी बिल्डर महेंद्र चव्हाण, शरद मारणे, जनरल सेक्रेटरी  अजय गोळे,  राम बराटे,  मिनाक्षी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पंच म्हणून मंदार चवरकर, युनुस काझी, किरण जाधव, अतुल राऊत, संग्राम पवार, कौस्तुभ शेडगे, विशाल मोहिते, ओंकार शेवकर ,शरद तिवारी, उमेश मोहतकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

मेन्स फिजिक्स पहिला गट

1 अजित तावरे, 2 प्रसाद सुतार, 3 प्रफुल्ल गायकवाड, 4 रुपेश कसबे 5 सुदेश भोसले

मेन्स फिजिक्स दुसरा गट

1 स्वप्निल बच्चे 2 अमर पडवळ, 3 मयूर पळसकर, 4 सोमेश सुतार, 5 अक्षय वारे

55 किलो गट

1 निलेश गजमल, 2 सोमनाथ पाल, 3 मोहीम बेपारी 4 आकाश देसाई, 5 अक्षय तांदळे, 6 अजय ओझरकर

60 किलो गट

1 अर्जुन देडे 2 मोहसीन शेख 3 सिद्धेश घडगे, 4 मनोज मानकर, 5 योगेश सूर्यवंशी, 6 विकास राठोड

65 किलो गट

1 संदीप तिवडे, 2 अमोल गावडे, 3 विनायक कलरीकन्डी, 4 अमन सय्यद, 5 शुभम सोनोरे, 6 शुभम शिंदे

70 किलो गट

1 अजय रक्ताटे, 2 शुभम मिसाळ, 3 आकाश दोरगे, 4 अक्षय खोमणे, 5 दिलावर शेख, 6 सचिन वाघ

75 किलो गट

1 मयूर कानसकर, 2 अरबाज शेख, 3 शुभम गिरी, 4 अक्षय गायकवाड, 5 प्रतीक साळुंखे, 6 सागर भालगरे

80 किलो गट

1 विनोद कागडे, 2 चांगदेव सायकल, 3 गोपाळकृष्ण देवर, 4 ओमकार गाडे, 5 सुरज शिंदे, 6 प्रणव रिकामे

80 किलो वरील गट

1 अक्षय शिंदे, 2 प्रदीप शिरसागर, 3 फिरोज शेख, 4 भरत चव्हाण, 5 संदेश ओझगी, 6 उदय ननावरे

या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रमोद नाईक व राम बराटे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: