Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 

HomeपुणेBreaking News

Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 

कारभारी वृत्तसेवा Jan 12, 2024 2:08 PM

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती! 
Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 6 लाख 40 हजार घरांचे सर्वेक्षण | 45% काम पूर्ण
Chetna Kerure PMC | उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाचा पदभार काढला | महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका

| आगामी काळात 5 हजारहून अधिक कर्मचारी लागण्याची शक्यता

Maratha Samaj Survey | PMC | पुणे | राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात मराठा समाज (Maratha Samaj) आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण (Open Category Survey) करण्यात येणार आहे. पुणे शहरात (Pune City) देखील हे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) 1 हजार 5 कर्मचाऱ्यांची या कामासाठी प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान आगामी काळात या कामासाठी 5 हजार हून अधिक कर्मचारी लागण्याची शक्यता आहे.  हे काम कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम दिले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात देखील हे काम असणार आहे. आगामी काळात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेकडून माहिती मागवण्यात येत आहे. कमी कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यकता आहे. सध्या तरी प्रशासनाकडून विविध खात्यातील 1 हजार 5 कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त केले आहेत. 15 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक असणार आहे. तर याचे सगळे नियंत्रण हे उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे असणार आहे. आगामी काळात अजून जास्त कर्मचारी लागतील. दरम्यान हे काम कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असेल.   दरम्यान प्रत्यक्ष अजून या कामाला सुरुवात झालेली नाही. सरकारच्या आदेशानुसार याची सुरुवात होणार आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
—-
राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार या सर्वेचे काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन काम सुरु आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सरकारच्या प्रोटोकॉल नुसार कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते.
चेतना केरुरे, उपायुक्त