Maratha Samaj Survey in Pune City | Pune PMC | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना केले हे आवाहन | जाणून घ्या सविस्तर!
Maratha Samaj Survey in Pune City| Pune PMC | मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे (State Commission for Backward Classes) यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation News)
याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे व सहकार्यासाठी आवाहन करणे गरजेचे आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये देखील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या २००७ प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. सदरील सर्वेक्षण मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप वर livedata entry मार्फत करण्यात येणार आहे. (Pune PMC News)
याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना आवाहन केले आहे. महापालिकेने म्हटले आहे कि, यादरम्यानच्या कालावधीत आपण घरी उपस्थित राहून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मनपाच्या प्रगणकास माहिती देऊन सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे.
-
पुणे महापालिकेचा प्रगणक कसा ओळखाल?
सदरील प्रगणकाकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले ओळखपत्र असणार आहे. तसेच सर्वेक्षणासाठी भेट दिलेल्या या घरावर MSBCC या पद्धतीची निशाणी नोंदविणार आहे.

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जातील?
तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?
लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?
जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?
हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.
मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.
मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील.
मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
तुमच्या घरात शौचालय आहे का?
तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे?
तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?
मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का?
तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील.
या प्रश्नावलीच्या मॉड्यूल ‘डी’मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.
तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?
विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?
तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं?
गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?
असे एकूण 33 प्रश्न असतील.
आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.
—