Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 6 लाख 40 हजार घरांचे सर्वेक्षण | 45% काम पूर्ण
| उपायुक्त चेतना केरुरे यांची माहिती
Maratha Reservation Survey in Pune City| Pune PMC | मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey in Maharashtra) सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे (State Commission for Backward Classes) यासंदर्भातील सूचना प्रकाशित केली होती. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 6 लाख 40 हजार घरांचा सर्वे झाला असून 45% काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी केला आहे. (Maratha Reservation News)
| 3 हजारहून अधिक प्रगणकाची नियुक्ती
या कामासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये देखील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात येत आहे. सदरील सर्वेक्षण मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत करण्यात येत आहे. (Pune PMC News)
– 100% सर्वेक्षण होण्याची शक्यता कमी!
29 जानेवारी पर्यंत महापालिकेने 6 लाख 40 घरांचे सर्वेक्षण केले आहे. शहरात जवळपास 12 लाख हून अधिक मिळकती आहेत. म्हणजे महापालिकेने 45% काम पूर्ण केले आहे. महापालिकेकडे अजून दोन दिवस बाकी आहेत. या दोन दिवसात पूर्ण शहरात सर्वेक्षण होऊ शकेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे लोकांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती न देता पिटाळून लावले जात आहे. यामुळे देखील सर्वेक्षणात अडचणी आहेत. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून दूरचा परिसर दिल्याने कर्मचारी देखील त्रासून गेले आहेत. त्यामुळे पूर्ण शहराचे 100% सर्वेक्षण करणे, हे महापालिकेपुढे आव्हान असेल.