Maharashtra Day in PMC | पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन संपन्न

Homeadministrative

Maharashtra Day in PMC | पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन संपन्न

Ganesh Kumar Mule May 01, 2026 9:03 AM

CM Eknath Shinde | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अजून एक सवलत | राज्य सरकारची घोषणा
State Co-operative Bank : राज्य सहकारी बँक कैद्यांना देणार कर्ज!
Dr Chandrakant Pulkundwar IAS | विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना | नागरिकांना १५ मे अखेर स्व-गणना करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

Maharashtra Day in PMC | पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिन संपन्न

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार  ०१ मे  रोजी  महापौर, मंजुषा दीपक नागपुरे, पुणे महानगरपालिका यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महापौर, मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणे महानगरपालिके च्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच ध्वजारोहणा पूर्वी राष्ट्रीयगीत (वंदे मातरम) म्हणण्यात आले. सकाळी ७.१० वाजता  महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.

या प्रसंगी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)  ओमप्रकाश दिवटे आणि विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: