Mahametro | सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून बचाव करण्याकरता महा मेट्रो साठी एक सशक्त प्रणाली!

Homeadministrative

Mahametro | सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून बचाव करण्याकरता महा मेट्रो साठी एक सशक्त प्रणाली!

Ganesh Kumar Mule Sep 27, 2025 6:00 PM

Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत
Shivajinagar ST Station Pune | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू | माजी आमदार मोहन जोशी
Pune Metro | CM Eknath Shinde | पुणे मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

Mahametro | सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून बचाव करण्याकरता महा मेट्रो साठी एक सशक्त प्रणाली!

| महा मेट्रो आणि आयआयटी (IIT) कानपूरच्या C3iHub सोबत सायबरसुरक्षा सुनिश्चितीबाबत सामंजस्य करार

 

Cyber Security Mahametro – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महा मेट्रो) नागपूर आणि पुणे येथील ऑपरेशन्ससाठी सायबरसुरक्षा बळकटीसाठी आयआयटी (IIT) कानपूरच्या सी३आयएचयुबी (C3iHub) सोबत सामंजस्य करार आज (२६ सप्टेंबर) येथे मेट्रो भवन येथे आयोजित छोटे खाणी समारंभात करण्यात आला. या सामंजस्य करारावर महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर आणि C3iHub चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तनिमा हाजरा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. C3iHub हे आयआयटी (IIT) कानपूरची उपकंपनी आहे. (Pune Metro)

या प्रसंगी बोलताना, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर म्हणाले की सायबर प्रणालीला उत्पन्न होणारा धोका एक गंभीर समस्या असून महा मेट्रो देखील या धोक्यापासून अलिप्त नाही. मेट्रोचे अनेक विभाग असून या सर्व शाखांचा सर्व सामान्य नागरिकांशी संपर्क असतो. या मुळे सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून मेट्रो वंचित राहू शकत नाही आणि या पासून बचाव करण्याकरता एक सशक्त प्रणाली असणे अतिशय आवश्यक असल्याचे ते म्हणाले. महा मेट्रोने या दृष्टीने या आधी देखील प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात श्रीमती हाजरा यांनी महा मेट्रोने या उपक्रमाकरिता केलेल्या सहकाऱ्या करिता धन्यवाद दिले.

या कार्यक्रमास महा मेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. विनोद कुमार अग्रवाल, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व ऑपरेशन्स) श्री. अनिल कोकाटे, संचालक (वित्त) श्री. हरेंद्र पांडे तसेच C3iHub चे डॉ. आनंद हांडा (मुख्य धोरण अधिकारी) आणि डॉ. रस द्विवेदी (वरिष्ठ उपाध्यक्ष) उपस्थित होते.

देशातील कोणत्याही मेट्रो संस्थेसह आयआयटी (IIT) कानपूरचा हा पहिला सामंजस्य करार आहे. यामध्ये
आयटी (IT) प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि अधिकारी यांना सायबरसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हा करार निरंतर सुरु ठेवल्या जाईल. यामध्ये ऑपरेशन्स कंट्रोल, सिग्नलिंग, टेलिकॉम, पॉवर सप्लाय, ट्रेन ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन, बिल्डिंग व टनेल व्यवस्थापन, ट्रेन ऑनबोर्ड सिस्टम्स यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश आहे.

 कराराचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे:
• सायबरसुरक्षा गॅप मूल्यांकन (VAPT)
• धोरण व प्रशासन फ्रेमवर्क
• जोखीम कमी करण्याचा रोडमॅप
• सतत सुरक्षा देखरेख

महा मेट्रोच्या विविध प्रणालींमध्ये डेटाबेस मॅनेजमेंट, नेटवर्क मॅनेजमेंट, फायरवॉल्स, एअरगॅप्स आणि स्वतंत्र नेटवर्क यांसारख्या सुरक्षा उपाययोजना आहेत.या नवीन पुढाकारामुळे मेट्रोच्या सायबरसुरक्षेला जागतिक दर्जाच्या प्रमाणांशी (ISO/IEC 27001:2022, NIST-CSF, CERT-In) सुसंगत करेल आणि सतत वाढणाऱ्या सायबर धोक्यांविरुद्ध टिकाव राहण्यास मदत करेल. मूल्यांकन नागपूर (झिरो माइल ओसीसी, हिंगणा डेपो, सिताबर्डी, एअरपोर्ट साउथ, खापरी, आणि मेट्रो भवन) व पुणे (ओसीसी, रेंज हिल्स डेपो, सिव्हिल कोर्ट, पीसीएमसी, स्वारगेट, मेट्रो भवन) येथे केल्या जाईल.

आयआयटी (IIT) कानपूरने देशातील मेट्रो संस्थांपैकी पहिला सामंजस्य करार आहे. हा करार आयटी प्रणालींना मजबूत करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी जागरूक करण्यासाठी करण्यात आला आहे.हा MoU ऑपरेशन्स कंट्रोल, सिग्नलिंग, दूरसंचार, वीजपुरवठा, ट्रेन ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन, इमारत व टनेल व्यवस्थापन, तसेच ट्रेन ऑनबोर्ड सिस्टम्स या महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश असेल .

महा मेट्रो व्यतिरिक्त देशातील इतर मेट्रो संस्था देखील अशाच प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांवर काम करत आहेत.

• तक्रार निवारण व्यवस्थेत गुणवत्ता सुधारणा करणे जेणेकरून ती अधिक संवेदनशील, प्रवेशयोग्य आणि अर्थपूर्ण बनेल.
• अनुपालनाचा भार कमी करणे व लहान उल्लंघनांबाबत गुन्हेगारी प्रक्रियेचा समावेश कमी करणे.
• जागतिक सर्वोत्तम पद्धती लक्षात घेऊन वेबसाइटला अधिक वापरकर्ता अनुकूल बनविणे.
• आय टी (IT) प्रणाली मजबूत करण्यासाठी उपाययोजना करणे आणि अधिकाऱ्यांना सायबरसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यास जागरूक करणे.
• नवीन आणि चालू प्रकल्पांच्या अनुषंगाने जबाबदाऱ्यांना अनुरूप मनुष्यबळ गरजा निश्चित करणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: