Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक ची जबाबदारी | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश 

Homeadministrative

Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक ची जबाबदारी | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश 

Ganesh Kumar Mule Apr 23, 2025 5:30 PM

PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards
PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का? 
Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!

Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक ची जबाबदारी | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांच्यावर परिमंडळ एक ची जबादारी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS)  यांनी या बाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

मिळकत कर विभागाचा पदभार माधव जगताप यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. तो उपायुक्त प्रतिभा पाटील (Pratibha Patil PMC) यांना देण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे अद्याप कुठल्याही विभागाचा पदभार देण्यात आलेला नव्हता. दरम्यान महापालिका अधिनियम नुसार शिस्तीचा भंग केल्याबद्दल जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या होत्या.  मात्र महापालिका अधिनियम 56 नुसार एकाच व्यक्तीला दोन शिक्षा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आता जगताप यांना कुठल्याही एका विभागाचा पदभार देणे आवश्यक आहे. त्यानुसार जगताप यांना कुठले खाते मिळणार याबाबत “The कारभारी” वृत्तसंस्थेने प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी जगताप यांना परिमंडळ १ ची जबाबदारी दिली आहे. (Pune PMC News)

औंध येथील परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केट मधील गाळे धारकांना बेकायदेशीररित्या परवाने दिल्याप्रकरणी दोषी आढळलेले अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्यावर महापालिका आयुक्तांनी कारवाई केली आहे. महापालिका मिळकत कर विभागातही (PMC Property Tax Department) अधिकार नसताना दोन हजार चौ.फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळांच्या मिळकतींच्या करात परस्पर बदल केल्याप्रकरणी जगताप यांनी हयगय केल्याचे आढळले आहे. यामुळे जगताप यांच्या दोन वेतनवाढ तात्पुरत्या रोखल्या आहेत.