Love Jihad | PMC GB | महापालिका मुख्य सभेत गाजला ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा!

HomeBreaking News

Love Jihad | PMC GB | महापालिका मुख्य सभेत गाजला ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा!

Ganesh Kumar Mule Apr 20, 2026 9:41 PM

Flyovers and Subways in Maharashtra | महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन
Hadapsar Railway Station | हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट
Ganesh Bidkar on Ravindra Dhangekar | देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर बोलणारे तोंड काळे करून पळाले! | बिल्डर आत्महत्या प्रकरणात गणेश बिडकरांचा धंगेकरांवर हल्लाबोल

Love Jihad | PMC GB | महापालिका मुख्य सभेत गाजला ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा!

| भाजप नगरसेवक धीरज घाटे झाले आक्रमक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत लव्ह जिहाद चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक धीरज घाटे या विषयावरून मुख्य सभेत आक्रमक पाहायला मिळाले. दरम्यान महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्य सभेला दिले. (Dhiraj Ghate BJP)

नगरसेवक धीरज घाटे यांनी लव्ह जिहाद बाबत मुद्दा मुख्य सभेत उपस्थित केला. घाटे यांनी सांगितले कि, डायस प्लॉट परिसरातील एका मारवाडी मुलीला एका मुस्लीम मुलाने जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले. घाटे यांनी पुढे सांगितले कि आधीच त्या मुलीचे कुटुंब या आघातात असताना महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या घरावर अनधिकृत बांधकामची नोटीस पाठवली. अशा पद्धतीने नोटीस पाठवणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी घाटे यांनी केली.

दरम्यान या विषयात कॉंगेस ने देखील उडी घेतली. कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांनी मागणी केली कि, या विषयावर आम्हाला देखील भूमिका मांडण्याची संधी द्यावी. तसेच कॉंग्रेस ने आक्षेप घेतला कि, घाटे यांनी संबंधित मुलीचे नाव सभागृहात जाहीर केले. यामुळे कॉंग्रेस आणि भाजप नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

दरम्यान या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या विषयाची माहिती सभागृहात सादर केली. आयुक्त म्हणाले कि, अनधिकृत बांधकामाची आम्हाला ६ एप्रिल ला ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने १६ एप्रिल ला नोटीस दिली. मात्र अजून कुठली कारवाई झालेली नाही. आयुक्तांनी सभागृहाला आश्वस्त केले कि, नोटीस योग्य प्रकारे दिली कि नाही, याची चौकशी केली जाईल. तसेच नोटीस ची कारवाई संबंधित अधिकाऱ्यांकडून राजकीय हेतूने केली गेली आहे का, याची देखील चौकशी केली जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: