Lokvishwas Pratishthan Goa | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांचे पुण्यात होणार गीतरामायणावर आधारित महानाट्य! | जाणून घ्या तारखा 

HomeपुणेBreaking News

Lokvishwas Pratishthan Goa | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांचे पुण्यात होणार गीतरामायणावर आधारित महानाट्य! | जाणून घ्या तारखा 

गणेश मुळे Feb 03, 2024 3:49 PM

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश
Bageshwar Maharaj in Pune | बागेश्वरच्या बाबांचे घटनाविरोधी अशास्त्रीय दावे | कायदेशीर कारवाईची महा.अंनिसची मागणी
PMP’s e-bus depot | पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्‌घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

Lokvishwas Pratishthan Goa | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या दिव्यांग मुलांचे पुण्यात होणार गीतरामायणावर आधारित महानाट्य! | जाणून घ्या तारखा

 

Lokvishwas Pratishthan Goa |  लोकविश्वास प्रतिष्ठान या गोव्यातील संस्थेच्या दिव्यांग मुलांनी (Lokvishwas Pratishthans Divyang Students) पुणेकरांसाठी गीत रामायणावर आधारित महानाट्य सादर करण्याचे ठरवले आहे. या महानाट्याचा पहिला प्रयोग शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सिम्बॉयसिस ईशान्य भवन कॅम्पस, सिम्बॉयसिस स्कूल, म्हाडा कॉलनी, विमान नगर, पुणे येथे सायंकाळी चार ते सात या वेळात होणार आहे. तर दुसरा प्रयोग रविवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते चार यावेळेत कोथरूड पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात (Yashwantrao Chavan Natyagruh Pune) होणार आहे. अशी माहिती लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सचिव सविता देसाई (Savita Desai) आणि प्राचार्य अरविंद मोरे (Arvind More Principal) पत्रकार परिषदेत दिली. (Lokvishwas Pratishthan Goa)
या महानाट्यात सुमारे दोनशे अंध, दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. या दोन्ही कार्यक्रम मोफत असून पुणेकरांनी याला मोठा प्रतिसाद देऊन मुलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन देसाई आणि मोरे यांनी केले आहे.

सन २०२० मध्ये बाबूजी व गदिमांची जन्मशताब्दी होती. त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लोकविश्वास प्रतिष्ठानच्या मुलांनी गोव्यात एका कार्यक्रमात गीतरामायणाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली होती. हा कार्यक्रम काही पुणेकरांनी बघितला होता, त्यावेळी त्यांनी हा कार्यक्रम पुण्यात व्हावा असा आग्रह धरला होता. पुणेकरांच्या आग्रहाखातर या महानाट्याचा प्रयोग पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. असे सविता देसाई यांनी सांगितले.
The karbhari - Arvind More lokvishwas pratishthan
——–
: लोकविश्वास प्रतिष्ठान या संस्थेविषयी 
लोकविश्वास प्रतिष्ठान ही गोव्यातील सेवाभावी संस्था, गेली ४२ वर्षे वेगवेगळ्या क्षमतेच्या मुलांसाठी त्यांचे “शिक्षण व पुनर्वसन” यासाठी कार्यरत आहे. १९८० मध्ये दैनिक गोमंतकाच्या संपादकपदी रुजू झालेले कै. नारायण आठवले उर्फ अनिरुद्ध पुनर्वसु यांच्या लेखणीतून गोव्यातील दृष्टिबाधित लोकांना येणाऱ्या अडचणींवर लिहिलेल्या लेखाच्या माध्यमातून या संस्थेच्या उदय झाला. सुरवातीच्या २० वर्षाच्या काळात संस्थेने कर्णबधिर मुलांसाठी पहिली ते बारावी पर्यंत मराठी माध्यमातून निवासी शाळा चालवली. १९९८ मध्ये मानसिक विकलांग विद्यार्थ्यासाठी शाळा सुरु झाली. सन २००१ मध्ये दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु केली. २००९ पासून गोव्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात मानसिक विकलांगांसाठी शाळा सुरु केल्या. आजपावेतो संस्था मानसिक विकलांगांच्या सहा शाळा, कर्णबांधिरांसाठी पहिली ते बारावी पर्यंत व दृष्टिबाधित विद्यार्थ्यासाठी पहिली ते दहावी पर्यंत शाळा चालते. संस्थेच्या परिघात जवळजवळ ५०० विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. संस्था घटनेच्या शेवटच्या उद्दिष्टापर्यंत पोहचली असून मानसिक विकलांगांचा निवासी प्रकल्प आकार घेत आहे. १२ वयस्क पुरुष व ८ वयस्क स्त्रिया ह्यांच्यासाठी कायम निवास हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने झेपावत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.