हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद
: वन खाते आणि एका NGO च्या प्रयत्नांना यश
पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या मंगळवारी साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले होते. या घटनेमुळे हडपसर परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण झाली होती. दरम्यान त्याचा शोध सुरु होता मात्र तो मंगळवारी कुणालाही दिसला नव्हता. त्यानंतर रात्री वन खाते आणि एका NGO ने मिळून त्याला पकडले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
COMMENTS