Kothrud Bavdhan Ward Office | शास्त्री नगर परिसरातील नवभूमी चौक परिसरात स्वच्छता अभियान व जनजागृती | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

Homeadministrative

Kothrud Bavdhan Ward Office | शास्त्री नगर परिसरातील नवभूमी चौक परिसरात स्वच्छता अभियान व जनजागृती | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

Ganesh Kumar Mule Apr 25, 2026 7:34 PM

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या सदन‍िकांची सोडत प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलली
Naval Kishore Ram IAS | ५ लाखांवरील होणाऱ्या  विकास कामांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी होत नाही  | महापालिका आयुक्तांनी काही खात्यांवर दर्शवली नाराजी 
PMC Law Committee | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नती साठी विधी संवर्गातील अधिकाऱ्याला देखील संधी? : अभिप्राय न घेता विधी समितीने प्रस्ताव मान्य केल्याने आश्चर्य व्यक्त 

Kothrud Bavdhan Ward Office | शास्त्री नगर परिसरातील नवभूमी चौक परिसरात स्वच्छता अभियान व जनजागृती | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन -२०२६, स्वच्छता पूर्व पुरस्कार” अन्वये शास्त्रीनगर परिसरातील नवभूमी चौक या ठिकाणी नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ करण्यात आला. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. (PMC Solid Waste Management Department)

दुरुस्ती विना व वापरा विना पडून असलेल्या सार्वजनिक शौचालया समोर परिसरातील काही नागरिक स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांना कचरा न देता रात्री अपरात्री कचरा टाकून अस्वच्छ करतात शिवाय सकाळी व रात्री घंटागाडी फिरून सुद्धा स्थानिक व आजू बाजूचे काही रहिवाशी सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छ करतात. शास्त्री नगर भागातील नागरिकांनी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता करणाऱ्या कामगारांना साथ दिली तर आपला परिसर स्वच्छ राहिल. केवळ स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता कामगांराची नसून ती नागरिकांची देखील आहे. सदर परिसरात ८०० बैठी घरे आहेत या सर्व घरांचा कचरा स्वच्छ सहकारी संस्थेच्या एकूण ४ कचरा वेचकाच्या माध्यमातून कचरा जमा केला जातो. शिवाय सकाळी व रात्री घंटा गाडी कचरा घेते. आरोग्य निरिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी प्रभारी मोकादम रोहित जाधव, ब्रँड अँबेसिडर व मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे यांनी तेथील नागरिकांना एकत्र करून परिसर स्वच्छ करून सडा टाकून रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

शिवाय सदर परिसरातील नागरिकांना स्वच्छते विषयी मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करा, आपला परिसर अस्वच्छ करू नका आपले आरोग्य धोक्यात आणू नका,आपल्या दारी येणाऱ्या कचरा वेचकांना वर्गीकृत कचरा द्या आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये पुणे शहराला एक नंबर आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. स्वच्छता व जनजागृती अभियान महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, गणेश खिरीड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या निरीक्षणाखाली ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: