Pune Hoarding QR Code |  महानगरपालिका हद्दीतील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर QR कोड सक्तीचे!  | कोड नसल्यास २७ मे पासून कारवाई केली जाणार

Homeadministrative

Pune Hoarding QR Code |  महानगरपालिका हद्दीतील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर QR कोड सक्तीचे! | कोड नसल्यास २७ मे पासून कारवाई केली जाणार

Ganesh Kumar Mule Apr 25, 2026 7:20 PM

PMC Property Tax | मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून आजपासून बँड चा वापर सुरु | पहिल्याच दिवशी 1 कोटी 58 लाख वसुली 
From today, the Pune Municipal Corporation starts using bands for Property tax arrears collection
Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु! 

Pune Hoarding QR Code |  महानगरपालिका हद्दीतील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर QR कोड सक्तीचे!

| कोड नसल्यास २७ मे पासून कारवाई केली जाणार | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

PMC Sky Sign Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत शहरातील सर्व अधिकृत जाहिरात फलकांवर QR कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या  जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. जाहिरात फलकांवर QR कोड त्यावर २७ मे पासून कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई चे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर  यांनी आदेश जारी केले आहेत.अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Prajit Nair IAS)

जगताप यांनी सांगितले कि, या निर्णयामुळे शहरातील जाहिरात फलकांबाबत अधिक पारदर्शकता येणार असून नागरिकांना संबंधित फलकाची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहे. QR कोड मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर संबंधित जाहिरात फलकाची परवानगी, नूतनीकरण, मालकी हक्क तसेच परवान्याची वैधता यासंबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहेत.

माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत QR कोड उपलब्ध करून दिला जाणार असून तो प्रत्येक जाहिरात फलकाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात स्पष्टपणे लावणे आवश्यक राहील. ज्या जाहिरात फलकांवर QR कोड आढळून येणार नाही किंवा मोबाईलवर QR कोड स्कॅन केल्यानंतर आवश्यक माहिती उपलब्ध होणार नाही व जाहिरात फलक सांगाड्यावर माहितीची पाटी नसलेले असे जाहिरात फलक अनधिकृत समजून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याची २७ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तसेच, QR कोडमधील माहितीमध्ये कोणताही बदल करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून यावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नियंत्रण राहील.  मुदतीनंतर नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कारवाईचे अधिकार सर्व सहाय्यक आयुक्त क्षेत्रिय कार्यालय यांना आहेत. कारवाई करण्यात कसूर झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: