Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील  पाणीसाठा वाढला | खडकवासला धरणातून ८७३४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग!

Homeadministrative

 Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील  पाणीसाठा वाढला | खडकवासला धरणातून ८७३४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग!

Ganesh Kumar Mule Jun 19, 2025 6:46 PM

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!
Khadakwasla Water Discharge | खडकवासला धरणातून आज 5 वाजता 1 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार
Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

 Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील  पाणीसाठा वाढला | खडकवासला धरणातून ८७३४  क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग!

Pune Rain – (The Karbhari News Service) –  खडकवासला धरणसाखळीतील चार प्रमुख धरणांमध्ये आज सायंकाळपर्यंत समाधानकारक पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चार धरणांमध्ये एकूण ८.६८  टीएमसी (२९.७८%) पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३.६२ टीएमसी (१२.४३%) होता.  मागील वर्षी पेक्षा हा समाधान कारक पाणीसाठा मानला जात आहे. दरम्यान काल पासून पडत असलेल्या पावसाने खडकवासला धरण भरत आले असून धरणातून ८७३४ कुसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.   (Pune Irrigation Department)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात या आठवड्यात चांगला पाऊस पडू लागला आहे. दरम्यान काल रात्री पासून पडत असलेल्या पावसाने धरणात समाधान कारक पाणीसाठा जमा झाला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

खडकवासला धरणात आज ७३  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात १.६६ टीएमसी पाणीसाठा असून, हे प्रमाण ८३.९५% आहे. आज दुपार पासून  खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सायंकाळी ७  वाजत ८७३४ कुसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.अ

पानशेत धरणात आज ११५ मि.मी. पाऊस झाला आहे. धरणात सध्या २.४६ टीएमसी (२३.१३%) पाणीसाठा आहे.

वारसगाव धरणाची स्थितीही चांगली असून, आज ११३  मि.मी. पाऊस झाला आहे. धरणात ४.१६ टीएमसी (३२.४५%) पाणीसाठा  आहे.

टेमघर धरणात आज ९० मि.मी. पाऊस झाला आहे. या धरणात ०.४० टीएमसी (१०.८४%) पाणीसाठा आहे.

सध्या या चार धरणांमध्ये मिळून ८.६८  टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो एकूण क्षमतेच्या २९.७८% आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १२.४३% होता.