Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!
| खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 12 तासांत वाढले 1 टीएमसी पाणी
| धरणांत सद्यस्थितीत 12.22 TMC पाणी
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरणामध्ये 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर गेल्या अवघ्या 12 तासांत 1 टीएमसी पाणी वाढले आहे. बुधवारी संध्याकाळी हा साठा 11.24 टीएसमी होता. आज सकाळी 6 वाजता हा साठा 12.22 टीएमसी झाला आहे. असे असले तरी शहरातील पाणीकपात तूर्तास तरी जैसे थे च राहणार आहे. जोपर्यंत खडकवासला धरणांतून नदीत पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत ही पाणीकपात अशीच राहणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 19.35 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र पाणी 7 टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (Pune water cut update)
4 धरणांत 41.93% इतके पाणी
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 12.22 टीएमसी म्हणजे 41.93% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.01 टीएमसी म्हणजे 51.35%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 4.73 टीएमसी म्हणजे 44.40%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 5.46 टीएमसी म्हणजे 42.61%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.02 टीएमसी म्हणजे 27.46% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 19.35 टीएमसी म्हणजे 66.38% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title |Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | Water shortage in the city is likely to continue until the release of water from Khadakwasla is not released!