महापालिकेच्या प्रस्तावानुसार सन २०२३-२०२४ मध्ये पुणे महानगरपालिकेसाठी आवश्यक वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये पुणे महानगरपालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलीत करण्यात आली असून पुणे शहराची लोकसंख्या एकूण ५२,०८,४४४ इतकी निश्चित झाली होती. सादर करण्यात आलेल्या सन २०२२-२३ च्या पाण्याच्या अंदाजपत्रकामध्ये सन २०१९ च्या लोकसंख्येमध्ये प्रति वर्ष वार्षिक २% वाढ गृहीत धरून तसेच महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या (२९२८५७) तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांची लोकसंख्या (८०००००) व ५% तरंगती लोकसंख्या गृहीत धरून ६९,४१,४६० इतक्या लोकसंख्येसाठी ३५ % पाणी गळतीसह महापालिका आयुक्त यांचे स्वाक्षरीसह सन २०२२-२०२३ साठी एकूण २०.३४ TMC एवढे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते. मात्र जलसंपदा विभागाने 12.41 टीएमसी पाणी मंजूर केले होते. (Pune Municipal Corporation News)

PMC Water Budget | महापालिकेकडून 20.90 टीएमसी पाणी देण्याची मागणी ; पण पाटबंधारेने मात्र फक्त 12.82 TMC पाणी कोटा केला मंजूर
Ganesh Kumar Mule Oct 11, 2023 4:15 PM
PMC Water Budget | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता अर्थात 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी (20.90 TMC) पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट (PMC Pune Water Budget 2013-24) जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) सादर करत ही मागणी केली होती. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने फक्त 12.82 TMC पाणी कोटा मंजूर केला आहे. पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा मनमानी केल्याचे समोर आले आहे. (PMC Water Budget)
सन २०२३-२४ मध्ये सन २०२२-२०२३ च्या लोकसंख्येमध्ये २% वाढ गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहराच्या ५६,३७,७८५ या लाकसंख्येस १५० एल.पी.सी.डी.प्रमाणे सन २०२३-२४ साठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांची ८१६००० लोकसंख्या करिता ७० एल.पी.सी.डी.प्रमाणे व नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या २९८७१४ करिता ७० एल.पी.सी.डी.प्रमाणे मागणी करण्यात आलेली आहे. (PMC Pune News)
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये व्यापारी (घरगुती वापराकरिता) पाणी वापर हा घरगुती वापर १५० एल.पी.सी.डी. चे व्यतिरिक्त असल्याने त्यासाठी स्वतंत्ररित्या १०७.९९ एम.एल.डी. पाणी कोट्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे शहर, समाविष्ट गावे, व्यापारी पाणी वापर, पाणी गळती ३५ % सह एकूण २०.९०TMC पाण्याची मागणी सन २०२३- २४ करिता नोंदविण्यात आली होती. मात्र पाटबंधारे विभागाने फक्त 12.82 TMC पाणी कोटा मंजूर केला आहे. (PMC Pune Water Supply Department)
Breaking News
6085
PMC
3627
social
3607
पुणे
6936
Department of Water Resources
34
PMC News
507
PMC Pune
1559
PMC Water Budget
6
PMC water supply department
100
Pune Municipal Corporation
1132
AUTHOR: Ganesh Kumar Mule
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...