Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी

HomeBreaking Newsपुणे

Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी

गणेश मुळे Feb 24, 2024 3:28 AM

Pune Water Crisis | पुणे महापालिकेला दररोज किमान 50 MLD पाणी बचत करावी लागणार!
Chandrkant Patil | संभाव्य पाणीकपातीने येणाऱ्या अडचणींबाबत तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 

Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी

Khadakwasla Canal Advisory Committee |  पुणे | पालकमंत्री अजित पवार (Pune Guardian Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षते खाली आज शनिवारी (24 फेब्रु) रोजी खडकवासला (Khadakwasla Dam) आणि भामा आसखेड प्रकल्पाच्या (Bhama Askhed Project) कालवा सल्लागार समितीची बैठक (Khadakwasla Canal Advisory Committee) होणार आहे. पाणी नियोजनाबाबत ही बैठक होणार असून यात शहरात पाणीकपात (Water Cut in Pune) होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल. असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (PMC Water Supply Department)
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमधून आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पुणे वगळता राज्यात यंदा खूप कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे शहरांसोबत ग्रामीण भागाला देखील पाणी द्यावे लागणार आहे. याचा भार पुण्यातील धरणांवर येईल असे बोलले जात होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने देखील महापालिकेला पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने पाणीवापर कमी केला आहे.
दरम्यान खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये जवळपास 16 टीएमसी हुन अधिक पाणी शिल्लक आहे. पुणे शहराला ऑगस्ट महिन्यापर्यंत 8 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बाकी पाणी आवर्तनच्या माध्यमातून ग्रामीण भागात दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही. असे प्रशासनाला वाटते. तरीही हा निर्णय सर्वस्वी कालवा सल्लागार समितीचा आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.

– वाढीव बिलांबाबत चर्चा शक्य

दरम्यान पाटबंधारे विभागाकडून पाणीवापराच्या बदल्यात वाढीव बिल आकारले जात आहे. असा पुणे महापालिकेने केला आहे. डोमेस्टिक दराने पाणीबिल न आकारता औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जात असल्याने पाणी बिल कमी करण्याची मागणी पालिका प्रशासनाने केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने बिल कमी केलेले नाही. याबाबत देखील आजच्या कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.