Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

HomeपुणेBreaking News

Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

गणेश मुळे Jul 22, 2024 6:14 AM

Inauguration of various projects of Pimpri-Chinchwad Municipal Corporation by Deputy Chief Minister Ajit Pawar
Vaccination for 15 years : महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

| प्रदीप धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी केली मागणी

Vidhansabha Election 2024 – (The Karbhari News Service) महाराष्ट्र राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक होणार आहे. यासाठी सगळ्याच पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महायुती (Mahayuti) मध्ये अजून जागा वाटप झालेले नाही. खडकवासला विधानसभा मतदार संघ (Khadakwasla Vidhansabha Constituency) हा भाजपकडे (BJP) आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासल्याची जागा राष्ट्रवादी कॉग्रेस (NCP Ajit Pawar) पक्षाला मिळावी. अशी मागणी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal) यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी उपमुखमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. अजित पवारयांनी देखील याबाबत कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाची भावना आहे. (Khadakwasla Vidhansabha Election 2024)
धुमाळ यांनी दिलेल्या पत्रानुसार खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला २१००० हजार मताधिक्य या मतदारसंघातून मिळालेले आहे.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या सुद्धा सर्वात जास्त आहे. त्याच बरोबर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये विद्यमान खासदार आपल्या विचाराचे नसल्याने या मतदार संघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा आमदार असणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला मिळावा. अशी मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे यावेळी अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महायुतीच्या जागावाटप वेळी आपण या जागेची मागणी लावून धरू. असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. यामुळे आता राष्ट्रवादीच्या इच्छुकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ, रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, दत्ता धनकवडे, विजय रेणुसे, शुक्राचार्य वांजळे, विकास दांगट, शैलेश चरवड, बंडू केमसे, सागर भागवत, अश्विनी भागवत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.