Katraj Tunnel| Navale Bridge | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

HomeपुणेBreaking News

Katraj Tunnel| Navale Bridge | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

Ganesh Kumar Mule Jul 20, 2023 1:12 PM

PMC Pune | सेवा वाहिन्यांच्या प्रलंबित कामामुळे रस्ता दुरुस्तीचे टेंडर रखडले
Vidhansabha Election | भाजपकडून भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, हेमंत रासने | तर शरद पवार यांच्या पक्षाकडून अश्विनी कदम, सचिन दोडके यांना संधी
Insurance broker | Re-tender | इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार

Katraj Tunnel| Navale Bridge | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

Katraj Tunnel | Navale Bridge |मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Bengluru Highway)  वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान (Katraj Tunnel To Navale Bridge) वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत. Katraj Tunnel | Navale Bridge)

राज्य शासन गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार टॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असेही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


News Title |Katraj Tunnel | Navale Bridge | 40 km for heavy vehicles between Katraj Bogda and Navale Bridge. Fixed speed limit per hour