Kasba Constituency | Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना | हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

HomeपुणेBreaking News

Kasba Constituency | Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना | हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

गणेश मुळे Jun 18, 2024 3:08 PM

Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
Standing Commitee : PMC : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या
Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे

Kasba Constituency | Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना | हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

 

Kasba Constituency – (The Karbhari News Service) –  कसबा मतदारसंघाच्या कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. सदरील भाग हा दाट लोकवस्ती, मुख्य बाजार पेठ तसेच निवासी भाग, असा संमिश्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा होत असतो. महानगर पालिकेने कंटेनर मुक्त कचरा व्यवस्थापन केलेले असले तरी सदरील जागांवर अजून कचरा टाकला जात आहे. व सदरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्या उद्भविण्याची शक्यता आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी कसबा विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त  रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली. (Hemant Rasane Pune BJP)

कसबा, विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ६ प्रभागांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रासने यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळांने पुणे महापालिका जनरल सहायक आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे आणि अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. यांची आज भेट घेतली. यावेळी “कचरा मुक्त कसबा मतदार संघ ” संकल्पना राबवण्यासाठी महानगर पालिकेने सहकार्य करण्याची विनंती रासने यांनी केली. तसेच कसबा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडीचीही समस्या सोडविण्याची मागणी श्री. हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

दरम्यान, पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी तसेच प्रभागातील काही प्रलंबित समस्या लवकर सोडवण्यासाठीचे निवेदन देखील देण्यात आले. पावसाळी गटार लाईन स्वच्छ नसल्यामुळे विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ड्रेनेज लाईन साफ न केल्यामुळे विविध ठिकाणी ड्रेनेज तुंबणे आणि त्याचे पाणी उलटे नागरिकांच्या घरात जाणे तसेच धोकादायक झाडे, फांद्या पडणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिकेने योग्य ती कारवाई करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, राजेश येनपुरे, मनिषा लडकत, गायत्रीताई खडके, उदय लेले, राजू परदेशी, छगन बुलाखे, विष्णूआप्पा हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर, अर्चना पाटील, सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, कसबा मतदारसंघाच्या महिलामोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

——

पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा द्या | हेमंत रासने यांची महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी

| कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आयुक्तांना विनंती

 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यनगरीत कसबा विधानसभा मतदारसंघात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचा मुक्काम ३० जून आणि १ जुलै २०२४ रोजी असणार आहे. या दोन्ही दिवशी विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी मुक्कामास असतात. या वारकऱ्यांना आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख  हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त  रविंद्र बिनवडे यांना निवेदन दिले.

पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कसबा विधानसभा मतदारसंघात आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा, पाणी पुरवठा, दिवसभर वैद्यकीय सुविधा, फिरते शौचालय आणि मंडप व्यवस्था विविध भागांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी हेमंत रासने यांनी केली आहे.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “पालखी सोहळा हा सर्वांसाठी आनंद देणारा आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करून पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. यानिमित्ताने पुण्यनगरीत येणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत. याचबरोबर वारकऱ्यांना पाणी पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता, फिरते शौचालय आणि आवश्यक मंडप व्यवस्था मिळवून देण्यासाठी आज आम्ही पुणे महानगरपालिका जनरल सहा. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे आणि पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी. यांनी निवेदन दिले आहे”.

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे, योगेश समेळ, राजेश येनपुरे, मनिषा लडकत, गायत्रीताई खडके, उदय लेले, राजू परदेशी, छगन बुलाखे, विष्णूआप्पा हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर, अर्चना पाटील, सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, कसबा मतदारसंघाच्या महिलामोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.