PMC : Corporators : महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!     : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार 

HomeBreaking Newsपुणे

PMC : Corporators : महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!   : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार 

Ganesh Kumar Mule Oct 28, 2021 5:57 AM

PMC Election : NOC : Corporators : NOC साठी नगरसेवकांची लगबग! 
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची हद्द अजून वाढणार | नगरसेवकांची संख्या देखील वाढणार!
Emotional Corporators : PMC : कालावधी संपल्यानंतर पुणे महापालिकेतील नगरसेवक झाले भावुक  : काही नगरसेविकांना अश्रू अनावर 

महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!

: सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार

पुणे: महापालिकेत नगरसेवकांची संख्या 15-17% वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र शहर आणि समाविष्ट गावांची लोकसंख्या गृहीत धरता किती नगरसेवक किंवा किती प्रभाग वाढतील, हे अजून पर्यंत निश्चित झालेले नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे.

: 175 च्या पुढे नगरसेवक जाणार नाहीत

महापालिकेची नगरसेवक संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता नेमका कोणाचा फायदा होणार आणि कोणाची ताकद वाढणार, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या महिनाभरापूर्वीच्या आदेशाने शहरातील नवीन प्रभागांची संख्या 55 वर जाणार होती. मात्र, शासनाच्या आदेशातील गोंधळामुळे ही प्रभागांची संख्या 59 अथवा 62 पर्यंत जाईल. तर 2017 च्या निवडणुकांवेळी ही प्रभाग संख्या 41 होती. त्यानंतर 11 समाविष्ट गावांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर ही प्रभाग संख्या 42 वर गेली आहे. सरकारने निर्णयात म्हटले आहे कि 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 161 नगरसेवक असतील. त्यापुढे प्रत्येकी 1 लाखासाठी 1 नगरसेवक असेल. शहर आणि समाविष्ट गावे यातील लोकसंख्या गृहीत धरता नगरसेवकांची संख्या 173 पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र अंतिम संख्या अजून निश्चित झालेली नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. सरकारला अगोदर 34 गावांची 2011 ची लोकसंख्या गृहीत धरावी लागणार आहे. त्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे. असे असले तरी मात्र सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0