Iran Israel War | मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज | ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याचे पुणे मनपा आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

Iran Israel War | मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज | ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याचे पुणे मनपा आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Mar 02, 2026 8:06 PM

Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती
PMC Recruitment Committee | महापालिका वर्ग १ ते ३ मधील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी ९ अधिकाऱ्यांची निवड समिती गठीत!
Bhimashankar Temple | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद करण्याचा संस्थांनचा निर्णय – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Iran Israel War | मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज | ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याचे पुणे मनपा आयुक्तांचे आदेश

 

Iran Israel News – (The Karbhari News Service) – मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. (Pune News)

पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

जिल्ह्यातील १ ते २ मार्च या कालावधीत दुबई येथे अडकलेल्या एकूण १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित सर्व नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आलेला असून ते सर्व सुरक्षित आहेत.

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in, https://x.com/i/status/2027746402575782262 नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

———

इराण-इस्रायल युद्धस्थितीमध्ये अडकलेले पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ‘विशेष मदत कक्ष’ व ‘डेटा बँक’ कार्यान्वित करण्याबाबत मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांस आदेश देण्यात आलेले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये सध्या उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि व्यावसायिक तिथे अडकल्याची दाट शक्यता आहे. युद्धभूमीवर अडकलेल्या या पुणेकरांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करता, पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
१. २४x७ हेल्पलाईन कक्ष: पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून २४ तास कार्यरत
असणारा हेल्पलाईन क्रमांक तातडीने जाहीर करावा.
२. पर्यटक आणि नागरिकांची डेटा बँक युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणि
रहिवाशांची अधिकृत यादी तयार करण्यात यावी.
३. नातेवाईकांकडून खालील माहिती संकलित करावी:
* अडकलेल्या व्यक्तीचे/पर्यटकाचे पूर्ण नाव.
* परदेशातील सध्याचा पत्ता/हॉटेलचा पत्ता.
* पासपोर्ट क्रमांक (Passport Number).
* तिथे उपलब्ध असलेला स्थानिक संपर्क क्रमांक.

समन्वय व कार्यवाही ही ‘डेटा बँक’ पुढील कार्यवाहीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सदर माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) तातडीने कळवावी, जेणेकरून तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी वेगवान हालचाली करता येतील.

सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर प्रशासनाने तातडीने (युद्धपातळीवर) कार्यवाही व्हावी असे आदेश देण्यात आलेले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: