International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

HomeपुणेBreaking News

International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

गणेश मुळे Jun 21, 2024 8:18 AM

Jumbo Covid Center : जम्बो कोविड सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला ‘हा’ खुलासा
Chandrashekhar Bawankule | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या
PMC Deputy Municipal Secretary Promotion | उपनगरसचिव पदाच्या बढती प्रक्रिये बाबत आता विभागीय आयुक्त देणार फैसला! | २२ ऑक्टोबरला सुनावणी

International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

International Yoga Day 2024 – (The Karbhari News Service) – भारतात प्राचीन काळापासूनच योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून नियमित योगसाधनमुळे व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते; शरीर सदृढ करण्यासोबत अंगी सकारात्मक उर्जा निर्मितीसाठी प्रत्येकांनी योगविद्या आत्मसात करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr Chandrakant Pulkundwar IAS) यांनी केले.

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय आणि ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यामाने विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, निलीमा धायगुडे, ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्रीमती योगश्वरी भट, डॉ. प्रशांत योगी, वंदना जैन आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शरीरासह मन निरोगी राहणे महत्वाचे आहे. अनेक ताणतणावांना सामोरे जातांना आपल्या अंगी सकारात्मक उर्जा असावी लागते. सकारात्मक उर्जा अंगीकारुन समाजातही ती रुजविणे गरजचे आहे. योगसाधनेमुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यासोबतच बुद्धीमत्तेत वाढ होण्यासोबत दैनंदिन कार्यशैलीत अनुकूल बदल होण्यास मदत होते, त्यामुळे प्रत्येकांनी नियमितपणे योग व ध्यानधारणा करावी, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

यावेळी श्रीमती जैन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगाचे प्रात्याक्षिक करुन दाखविले तर डॉ. योगी यांनी मानसिक कार्यक्षमता वाढीसाठी तणावमुक्तीच्या प्रयोगाबाबत मार्गदर्शन केले.