Pradhan Mantri Awas Yojana | PMC Pune | वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी 

HomeपुणेBreaking News

Pradhan Mantri Awas Yojana | PMC Pune | वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी 

Ganesh Kumar Mule Oct 13, 2022 2:33 PM

Latur Barshi Tembhurni Highway | लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!
PMC Fireman Bharti | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

 वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी

| गृहप्रकल्पांची कामे सुमारे  ८०% पूर्ण

पुणे महानगरपालिकेच्या स.नं. ३९ (पै) + ४० (पै) वडगांव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत इमारतींची व त्यामध्ये देण्यात येणाèया सुविधांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे यांनी  अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.


या गृहप्रकल्पांतील सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ३०० चौ. फुट ते ३३० चौ. फुट असून सदनिकेमध्ये हॉल, किचन, बेडरुम तसेच स्वतंत्र संडास व बाथरुमची सोय करण्यात आलेली आहे. तसेच गृहप्रकल्पामध्ये अॅल्युमिनिअम स्लायडिंग विंडो, सोलर वॉटर हीटर, दुचाकीचे पार्किंग, ऑर्गेनिक वेस्ट कन्वह्हर्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओपन स्पेसचे विकसन, अग्निशमन यंत्रणा, सांडपाणी प्रक्रिया सयंत्र, व्हेट्रीफायड टाईल्स, प्रशस्त आतील रस्ते, प्रत्येक इमारतीस पाण्याचे मीटर, पाण्याचा प्रवाह कमी करणारे साधन इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. सदरचे गृहप्रकल्पांची कामे सुमारे  ८०% पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. यावेळेस ज्या लाभार्थ्यांना सदनिका मिळाली आहे त्या लाभार्थ्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सदनिकेच्या विक्री किंमती मधून में केंद्र व राज्य शासन यांचे अनुक्रमे ५.५० लक्ष व १.०० लक्ष असे २.५० लक्ष इतके अनुदान प्राप्त होणार असून लाभार्थ्याना त्यांचे स्वःहिस्सा चे एकूण ८.०० लक्ष ते २.५० लक्ष मरवायचे आहेत. गृह प्रकल्पासाठी लागणारी जागा पुणे महानगरपालिकेमार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. एकूण २९१८ सदनिकांचे प्रथमतः ऑनलाईन सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले होते. परंतु कोव्हीड १२ च्या जागतिक महामारी मुळे नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक तसेच उत्पन्न, स्तोत्रा अभावी कर्ज प्रकरणे मंजूर न होणे, जागा पसंत नसणे या कारणास्तव बऱ्याच सदनिका रद्द झाल्या आहेत.

या अनुषंगाने पहिल्या ऑनलाईन सोडतीनंतर व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मधून शिल्लक राहिलेल्या व रद्द होऊन शिल्लक राहणाऱ्या सदनिकांकरिता नागरिकांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले होते. रिक्त सदनिकांची ऑन लाईन सोडत क्र. ०२ पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. सद्यस्थिती मध्ये पाच गृह प्रकल्पांमध्ये एकूण २८५ सदनिका रिक्त आहेत. या रिक्त सदनिकांकरिता चे वाटप प्रतीक्षा यादीमधील नागरिकांना वितरीत करण्याकरिता कागद पत्रे पडताळणी सुरु आहे.

सर्व गृह प्रकल्प हे अगदी शहरातील प्रमुख स्थाना लगत आहेत. सदर चे सर्व गृह प्रकल्पांतील सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ३००.०० चौ.फुट ते ३३०.०० चौ. फुट असून सदनिके मध्ये हॉल, किचन, बेड रूम तसेच स्वतंत्र संडास व बाथरूम ची सोय करण्यात आली. गृहप्रकल्पामध्ये खालील प्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत.

१. अल्युमिनीअम स्लायडिंग विण्डो ४. ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर

७. अग्निशमन यंत्रणा

| २. सोलर वॉटर हीटर ५. रेन वॉटर हार्वेस्टिंग

३. दुचाकी घे पार्किंग

६. ओपेन स्पेसचे विकसन ८. सांडपाणी प्रक्रिया संयंत्र २. व्हेट्रीफायड टाईल्स)

११. प्रत्येक इमारतीस पाण्याचे

१०. प्रशस्त आतील रस्ते

मीटर

१२. पाण्याच्या प्रवाह कमी करणारे

साधन

सदर चे सर्व गृह प्रकल्पांची कामे सुमारे ८०% पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.

याप्रसंगी मा. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मा. अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, मा. श्रीनिवास कंदुल , मा. कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.