How to Pay Pune Property tax Online | पुण्यात तुमचा मिळकत कर ऑनलाइन कसा भरावा? जाणून घ्या अधिकृत पोर्टल, पेमेंट करण्याची पद्धत आणि सर्व काही!
How to Pay Pune Municipal Corporation Property tax Online | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation PMC) शहरातील रहिवासी आणि व्यावसायिक मिळकत धारकांकडून मिळकत कर दरवर्षी घेते. हा मिळकतकर भरणे नागरिकांवर बंधनकारक आहे. मिळकतकर नाही भरला तर महापालिका त्यावर दंड आकारते. मिळकत कर भरण्यासाठी महापालिकेने विभिन्न सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन (Pune Property tax online and Offline) अशा दोन्ही पद्धतीने मिळकत कर भरू शकतात. गेल्या काही दिवसापासून मिळकतकर ऑनलाईन भरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न देखील चांगले मिळू लागले आहे. तुम्ही जर पुण्याचे नागरिक असाल तर तुम्ही कुठेही बसून ऑनलाईन पद्धतीने आपला मिळकतकर भरू शकता आणि दंड टाळू शकता. (How to Pay Pune Municipal Corporation Property tax Online)
पुणे महानगरपालिका मालमत्ता कर भरण्याच्या प्रक्रियेत पुढील टप्प्यांचा समावेश आहे:
PMC Property Tax च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन सुरुवात करा. ही आहे अधिकृत PMC Website: propertytax.punecorporation. org
विंडो उघडल्यानांतर तुमची माहिती भरा. नवीन विंडोमध्ये खाते क्रमांक, पेठ आयडी, विभाग आयडी, मालमत्ता प्रकार इत्यादीसह तपशील द्या. तुमच्या मालमत्तेचे तपशील आणि प्रलंबित कर देय रक्कम स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल. उर्वरित तपशील प्रविष्ट करणे सुरू ठेवा.
तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा.
तुम्ही निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर आधारित, तुम्हाला पेमेंट गेटवेवर निर्देशित केले जाईल. व्यवहारातील त्रुटी टाळण्यासाठी त्यांची अचूकता सुनिश्चित करताना आवश्यकतेनुसार तुमचे बँकिंग तपशील भरा. यामध्ये चार गेटवे दिले आहेत.
तुम्ही सुलभ पद्धतीने UPI, EMI, IMPS, SI, Wallet, Cash Cards, Credit Cards, Debit card किंवा Internet Banking च्या माध्यमातून पैसे भरू शकता.
जर पैसे भरताना तुम्हांला काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्ही pmc कडे इमेल च्या माध्यमातून तक्रार करू शकता.
हा आहे अधिकृत इमेल आयडी : propertytax@punecorporation. org
तुमचा मिळकतकर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर तुमच्या खात्यातून रक्कम डेबिट केली जाईल. पुढील तीन दिवसांत याबाबतचे अपडेट तुम्हांला मिळेल. तसे नाही झाल्यास तुम्ही वरील इमेल आयडीवर तक्रार करू शकता.
एकदा रक्कम डेबिट झाल्यानंतर दोन वेळा तीच प्रक्रिया करू नका. तुमच्या खात्यातून रक्कम कापली गेली मात्र तरीही मिळकतकर भरला गेला नाही तर महापालिकेच्या इमेल आयडी वर तक्रार करा.
त्याचप्रमाणे तुमची PMC Property Tax Receipt चेक करण्यासाठी https://propertytax. punecorporation.org
या वेबसाईटला भेट द्या.
| पुण्यात मालमत्ता कर ऑफलाइन कसा भरावा?
तसेच ऑनलाइन मोडला पर्याय म्हणून ऑफलाईन पद्धतीने देखील pmc Property tax भरू शकता. तुम्ही खाली नमूद केलेल्या कोणत्याही कार्यालयात जाऊन Pune Property tax भरू शकता. वाटेत तुमचा चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा रोख सुरक्षितपणे घेऊन जाण्याचे लक्षात ठेवा.
1. टॅक्स पेमेंटसाठी स्व-पे कियोस्क.
2. नागरिक सुविधा केंद्रे.
3. ICICI बँक, कॉसमॉस बँक, HDFC किंवा बँक ऑफ महाराष्ट्रच्या मंजूर शाखा.
4. पुणे महानगरपालिका 15 क्षेत्रीय कार्यालये.