Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या
Housing Society & Quality city Expo | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) , नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (National Society for clean city) व पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ (Pune District Gruhnirman Mahasangh) यांचे संयुक्त विद्यमाने “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली.
२७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे या ठिकाणी “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टार्टअप कंपन्यांनी उपकरणे व उत्पादने समावेश आहे. त्याद्वारे नागरिकांना विविध तंत्रज्ञानाबाबत एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होणार असून शहर दर्शनी साफ़ दिसण्यात मदत होईल. शुध्द हवा, शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी ओला कचरा जिरवीणाऱ्या विविध तंत्रज्ञान प्रदात्यांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार आहे.
गुणवत्ता पूर्ण शहर निर्माण (क्वालिटी सिटी मिशन) करणे हा केंद्र सरकारच्या अभियानाचा एक महतवपूर्ण भाग असून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार आणि नागरिकांचा कृतीशील, सातत्यपूर्ण सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. ही संकल्पना पुणेकर नागरिकांसमोर ठेवण्यासाठी सहकार विभाग (महाराष्ट्र
शासन), पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (NSCC) आणि विविध समविचारी, सहयोगी संस्था “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करीत आहेत.

“Housing Society & Quality city Expo” ला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून संबोधित करणार आहे. २७/१०/२०२३ रोजी “Housing Society & Quality city Expo” चे उद्घाटन व
मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दि. २८/१०/२०२३ रोजी पर्यावरण पुरक वाँड सोसायटी व दर्शनी शहर सफाइत नागरिकांचा सहभाग याविषयी विशेष सत्र सादर होणार आहे. यामध्ये नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सीटीस यांच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे ५० वर्ष कामामागील (१९७३ ते २०२३) मनोगत सादरीकरण, श्रीमती. पुर्वा केसकर यांचे विचार, पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व शुद्ध हवा व इतर योजनांची माहिती, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या योजना, कर आकारणी व कर संकलन, पुणे
विभागाचे सादरीकरण मा. डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व मा.नीलमताई गोऱ्हे उप सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.

“Housing Society & smart Quality city Expo” चा लाभ जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्था, शासकीय – शैक्षणिक संस्था व खाजगी संस्था व पुणेकर नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.