Gormale Shri Siddheshwar Yatra | भाजून काढणारी सूर्याची प्रखर उष्णता आणि आचारसंहितेचे  सावट असताना देखील गोरमाळेच्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद!

HomeBreaking Newssocial

Gormale Shri Siddheshwar Yatra | भाजून काढणारी सूर्याची प्रखर उष्णता आणि आचारसंहितेचे  सावट असताना देखील गोरमाळेच्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद!

गणेश मुळे May 05, 2024 2:11 AM

Raj Thackeray : शिवजयंती तिथीनुसार का साजरी करायची…  : राज ठाकरे यांनी दिले स्पष्टीकरण 
Manjri Flyover | मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Gormale Shri Siddheshwar Yatra | भाजून काढणारी सूर्याची प्रखर उष्णता आणि आचारसंहितेचे  सावट असताना देखील गोरमाळेच्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद!

 
 
 
Gormale Shri Siddheshwar Yatra – (The Karbhari News Service) – जगाचा कल्याणकारी राजा म्हणून ओळखला जाणारा सूर्य (Sun) उन्हाळ्याच्या (Summer) दिवसांत तर मानवाला आपलं अस्तित्व दाखवण्याची कसलीही संधी सोडत नाही. मानवासमोर न झुकता तो तळपत राहतो. मे महिन्याच्या (May) अशा प्रखर उन्हात यंदा अधिक मासामुळे (Adhikmass) गोरमाळेची (Gormale) यात्रा आली. एकीकडे पाय भाजून काढणारी उष्णता तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे (Loksabha Election Code of Conduct) सावट. असे असताना देखील गोरमाळ्याच्या यात्रेत ‘चांगभलं’ चे सूर तेवढ्याच उत्कटतेने आळवले गेले. उस्फुर्त प्रतिसादात, सामाजिक एकोपा टिकवत भक्तिमय आणि मंगलदायी वातावरणात यात्रा पार पडली. (Gormale Village Yatra)
The karbhari - Gormale yatra song
 

अधिक मासामुळे यात्रा लांबणीवर 

 
चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची (Shri Siddheshwar Temple Gormale) तीन दिवसीय यात्रा असते. पहिल्या दिवशी देवाला ‘आंबील’ चा नैवेद्य असतो. यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपली आहे. आधुनिक  जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते. यंदा अधिक मासामुळे यात्रा जवळपास 1 महिना पुढे गेली. सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दरवर्षी यात्रा सुरु होते. यंदा मात्र मे उजाडला. पारा 40 अंशाच्या पुढे गेलेला. असे असले तरी गावातील लोकांचा उत्साह आणि यात्रा साजरी करण्याची जिद्द तेवढीच दांडगी!
The karbhari - shri siddheshwar yatra gormale

सोंग सादर करण्याची अखंडित परंपरा 

यात्रेचा दुसरादिवस म्हणजे म्हणजे छबिना. छबिना ची पालखी निघताना सोंगे सादर केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक नाट्यविष्कार सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. बैलगाडया उपलब्ध नसल्या तर ट्रॅक्टर आणि इतर वाहनांचा उपयोग केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. कित्येक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली आहे. अजूनही ही परंपरा जपली जातेय. ज्याचं नेहमीच कौतुक केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून तर तरुण मुलं उत्साहानं यात भाग घेऊ लागली आहेत. आयटी मेडिकल, इंजिनियरिंग, अध्ययन अशा सर्वच क्षेत्रातील युवक यात हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत.
The karbhari - Gormale yatra song

प्रोत्साहन मिळेल देखील मात्र उमेदीचं काय? 

 
यात्रेत सोंग सादर करण्याच्या कलेचं कौतुक होत असलं तरीही ही परंपरा अखंडित ठेवणं आणि त्यात नावीन्य आणणं ही दोन आव्हानं समोर असणार आहेत. सोंग सादर करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ही मंडळी कसलेली कलाकार नसतात. यात्रेच्या ऐन वेळी सगळी जमवाजमव सुरु असते. कधी गाडी मिळत नाही. कधी योग्य पात्र मिळत नाहीत. तर कधी पात्र मिळतात मात्र ऐन वेळेला तो कच खातो. यामुळे मग सोंग सादर करण्याचा उत्साह मावळून जातो. यामुळे नवीन गाड्या तयार होत नाहीत. गावातील लोकांकडून सोंग सादर करायला प्रोत्साहन दिलं जातं मात्र ती सादर करण्याची उमेदच आणि प्रेरणा नसेल तर मग नवीन लोकं कशी तयार होणार. यासाठी सामूहिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. गावात आता शिक्षक क्षेत्रापासून ते आयटी, मेडिकल, वकील, उद्योग, खेळ, पत्रकारिता, महसूल अशा सर्व क्षेत्रात इथल्या युवकांनी बाजी मारलीय. मात्र कला, अभिनय हे क्षेत्र मात्र या गावापासून बरंच दूर आहे. छोटेसे प्रयत्न झाले असतील देखील मात्र ते नावारूपाला आलं नाही. पुण्यासारख्या आणि इतर शहरात आणि गावांत गणेश उत्सव काळात आपली कला सादर करून काही कलाकारानी अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. सोंग हे देखील एक माध्यम ठरू शकतं. मात्र त्यासाठी ऐन वेळी प्रयत्न न करता कसदार कलेसाठी मनापासून प्रयत्न व्हायला हवेत. अगदी तसंच कुस्तीच्या बाबतीत देखील घडतं. कुस्तीला देखील गावातील काही युवक ऐन वेळी आखाड्यात उतरतात. तेच जर वर्षभर व्यायाम करणारे पहिलवान असतील तर त्यांचा आदर्श घेऊन इतर युवक पुढे येऊ शकतात. यात्रेत जसं आर्थिक नियोजन आणि अन्नदान यासारखे उपक्रम छान पद्धतीने राबवले जातात अगदी तशाच पद्धतीने यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न करायला काय हरकत आहे!! कोण जाणे .. सिद्धेश्वर यश देईल ही ..!