स्पोर्ट शुज घालुन झोपणारे गिरीश बापट | माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितलेला किस्सा
स्व गिरीश बापट साहेब आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची जिगरी मैत्री . त्यातून अनेक किस्से ऐकायला अनुभवायला मिळाले. विधिमंडळाची लॉबी असो ,मॅजेस्टिक आमदार निवास तील खोली असो की सार्वजनिक व्यासपीठ दोघेही एकत्र आले की हास्य कल्लोळ ठरलेला.
असाच एक आठवणीतील किस्सा सोपल यांच्या भाषेत .. ” नागपूर अधिवेशन काळातील हा प्रसंग . अधिवेशन काळात मॉर्निंग वॉक चा गिरीश बापट आणि मी संकल्प केला. बापट म्हणले चला सोपल स्पोर्ट शुज घेऊ. दोघांनी स्पोर्ट शूज घेतला. सकाळी ६ ला नागपूर च्या थंडीत मॉर्निंग वॉक ला जायचेच असा निश्चय करून आम्ही आपापल्या रूम कडे गेलो. सकाळी ठरल्याप्रमाणे मी बापटांच्या रूम वर गेलो दरवाजा ठोठावला त्यांचा पी ए डोळे चोळत बाहेर आला मी म्हटले अरे उठव तुझ्या साहेबांना . पी ए म्हणाला साहेब वॉकिंग ला जाऊन आलेत आणि परत झोपलेत. मी पाहिले तर खरच बापट शुज घालून झोपलेले . म्हटले आपल्याला उशीर झाला म्हणून मी गेलो वॉकिंग ला . परत विधिमंडळात भेट झाल्यावर बापट बोलले आरे दिलीप सकाळी उशिरा का आला ? मी बोललो झाला उशीर परत दुसऱ्या दिवशी गेलो परत तसाच प्रसंग वॉकिंग शुज घालून बापट झोपलेले . पी ए चे तेच उत्तर आताच येऊन झोपलेत. २-३ दिवस हे असेच चाललेले . जरा संशय आला काहीतरी गडबड आहे. चौथा दिवस पुन्हा पी ए बाहेर. त्याला विश्वासात घेतले काय गडबड आहे नक्की म्हणून विचारले त्याने त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले अहो सोपल साहेब तुमची लय धास्ती घेतली साहेबांनी थंडीत कुठे उठून मॉर्निंग वॉक ला जायचे म्हणून वॉकिंग शुज घालूनच झोपतात आणि तुम्ही आले की आताच आले वॉकिंग वरून असे मला सांगायला लावतात. आणि मग मी विधिमंडळ लॉबी त नाव न घेता बापटासमोर जेंव्हा हा प्रसंग सांगितला तेंव्हा मात्र माझा पी ए फुटला काय की म्हणून या गमती ची त्यांनी पण मजा घेतली . “