Ghanbhatta Varas Hakka Case | शेड्युल कास्ट आणि नवबौध्द यांच्याबाबत घाण भत्ता वारसा नेमणुकी बाबतची  स्थगिती उठवली 

HomeBreaking Newsपुणे

Ghanbhatta Varas Hakka Case | शेड्युल कास्ट आणि नवबौध्द यांच्याबाबत घाण भत्ता वारसा नेमणुकी बाबतची  स्थगिती उठवली 

गणेश मुळे Jun 24, 2024 3:27 PM

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी आता 28 फेब्रुवारी  ला
Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  सुनावणी पुन्हा लांबणीवर! |  नवीन सुनावणी आता 6 मे  ला
Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी आता 20 मार्च  ला

Ghanbhatta Varas Hakka Case | शेड्युल कास्ट आणि नवबौध्द यांच्याबाबत घाण भत्ता वारसा नेमणुकी बाबतची  स्थगिती उठवली

 

Aurangabad High Court – (The Karbhari News Service) – 24 जूनला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा समोर लाड पागे घाण भत्ता वारस केस सुनावणीसाठी आली होती. सुनावणी नंतर उच्च न्यायालयाने शेड्युल कास्ट आणि नवबौध्द यांच्याबाबत घाण भत्ता वारसा नेमणुकी बाबत स्थगिती दिली होती, ती स्थगिती उठवण्यात आली आहे. इतर जातीच्या वारसाबाबत प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
 घाणभत्ता (Ghanbhatta Allowance) अबाधित राहिलाच पाहिजे, या मागणीकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर (Aurangabad High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 24 जून तारीख दिली होती.
  घाणकाम भत्ता वारसा अधिकार कायम रहावा. या मागणीकरता महाराष्ट्र सरकारने ठाम व परीणामकारक भूमिका घ्यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची स्थगिती उठवावी व घाणीत काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उन्नती अजूनही मोठ्या प्रमाणात झालेली नाही.  याची दखल शासन दरबारी असलेल्या प्रतिनिधींनी घ्यावी व यावरची स्थगिती तात्काळ उठवावी. अशी मुख्य मागणी आहे. दरम्यान घाणभत्ता वारस केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर प्रलंबित आहे. (Ghanbhatta Varas Hakk)